एक्स्प्लोर
किम जोंगकडून आता शिक्षण मंत्र्यालाही तोफेच्या तोंडी
सोल: उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग याने पुन्हा आपल्या सहकार्यांला तोफेच्या तोंडी दिल्याचा दावा दक्षिण कोरियाने केला आहे. यापूर्वीही किम जोंगने देशाचे संरक्षण मंत्री ह्योन योंग चोल यांनाही तोफेच्या तोंडी दिले होते.
उत्तर कोरियाचा हुकूमशाह किंम जोंगच्या बैठकीदरम्यान शिक्षणमंत्री किम यांग जिन झोपेच्या डुलक्या घेत होते. यावरून त्यांना अटक करण्यात आली. याशिवाय त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने त्यांची हत्या करण्याने त्यांची अॅन्टी एअरक्राफ्ट गनने हत्या केल्याचं वृत्त दक्षिण कोरियातील वृत्त पत्रांनी प्रकाशित केलं आहे.
दरम्यान, या महिन्यात उत्तर कोरियाचे उपराजदूत थाहे योंग हो यांनी लंडनमध्ये दक्षिण कोरियाच्या दूतावासात शरण घेतली. कारण त्याच्यावरही उत्तर कोरियाच्या सरकारने योंगवर अपहार, लौंगिक शोषण आणि अतिमहत्त्वाची माहिती लीक करण्याचे आरोप केले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement