Coronavirus Omicron Variant : जगभरात पुन्हा एकदा कोरोना महासाथीचा जोर वाढू लागला आहे. सध्या सुरू असलेली कोरोनाची लाट ही ओमायक्रॉनची असल्याचे म्हटले जात आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे कोरोना बाधितांची संख्या उच्चांक गाठत असताना दुसरीकडे शास्त्रज्ञांनी मोठा दिलासा आहे. ओमायक्रॉनमुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढत  असताना रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी असल्याचे समोर आले आहे. कोरोनाची चिंता कमी करणारी ही बाब असल्याचे दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. 


कॅलिफोर्निया विद्यापीठातील रोगप्रतिकारकशास्त्रज्ञ डॉ. मोनिका गांधी यांनी म्हटले की, आपण सध्या पूर्णपणे वेगळ्या टप्प्यात आहोत. विषाणू हा नेहमीच आपल्यासोबत असतो. मात्र, या व्हेरियंटमुळे लोकांमधील रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होईल आणि त्यामुळे महासाथ आटोक्यात येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 


एक महिन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन व्हेरियंट आढळला होता. त्यानंतर शास्त्रज्ञांनी काळजी घेण्याचे आवाहन केले होते. मात्र, मागील आठवड्यात हाती आलेल्या डेटानुसार, वाढलेली रोगप्रतिकारशक्ती आणि विषाणूचे झालेले म्युटेशन यांमुळे आजाराचे स्वरूप गंभीर झाले नसल्याचा दावा करण्यात आला आहे. 


दक्षिण आफ्रिकेतील एका अभ्यासानुसार, कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटच्या लाटे दरम्यान रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांपैकी ओमायक्रॉनबाधितांची प्रकृती गंभीर होण्याची शक्यता 73 टक्क्यांनी असल्याचे आढळून आले. केपटाउन विद्यापीठाच्या इम्युनोलॉजिस्ट वेंडी बर्गर्स यांनी म्हटले की, कोरोनाबाधितांची संख्या आणि रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या वाढल्याने हा डेटा ठोस असल्याचे म्हणू शकतो. 


कोरोनाच्या यापूर्वी आलेल्या लाटांच्या तुलनेत अनेक घटकांमुळे ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे कमी गंभीर असल्या मागे काही घटक कारणीभूत असल्याचा दावा करण्यात येत आहे. कोरोनाचा संसर्ग सामान्यत: नाकातून सुरू होतो आणि घशात पसरतो. सौम्य संसर्गामुळे ते  श्वसनमार्गापेक्षा जास्त दूर जात नाही परंतु जर विषाणू फुफ्फुसात पोहोचला तर अधिक गंभीर लक्षणे उद्भवतात. मात्र, काही संशोधनानुसार ओमायक्रॉन व्हेरियंटचा फुफ्फुसात सहजपणे संसर्ग होत नसल्याचे समोर आले आहे. 


हाँगकाँगमध्ये, शास्त्रज्ञांनी एका शस्त्रक्रियेच्या दरम्यान, ओमायक्रॉन बाधितांच्या फुफ्फुसाच्या ऊतींचे नमुने अभ्यासले होते. त्या नमुन्यानुसार ओमायक्रॉनची वाढ ही इतर व्हेरियंटपेक्षा कमी असल्याचे समोर आले.


कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या डॉ. मोनिका गांधी यांनी म्हटले की, ओमायक्रॉनमुळे बाधितांची संख्या उच्चांक गाठू शकते. मात्र, या व्हेरियंटचा असलेली सौम्य लक्षणे ही संसर्गाच्या शेवटाची सुरुवात असू शकते असेही त्यांनी म्हटले.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha