मुंबई : यंदाच्या वर्षाचे रसायनशास्त्रील नोबेल पुरस्काराची आज घोषणा झाली. इमॅन्युएल चार्पेंटिअर आणि जेनिफर ए. डॉडना यांचा नोबेल पुरस्काराने गौरव केला जाणार आहे. जीनोम एडिटिंगच्या पद्धतीचा शोध लावल्याबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात येत आहे. 'स्वीडिश अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस' च्या समितीने ही घोषणा केली आहे. गेल्या वर्षी लिथियम-आयर्न बॅटरी बनवणारे वैज्ञानिक जॉन बी. गुडनिफ, एम. स्टॅनली विटिंगहॅम आणि अकिरा योशिनो यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले होते.





भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार


भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची काल 6 ऑक्टोबरला घोषणा झाली. या पुरस्काराचा एक भाग रॉजर पेनरोस आणि दुसरा भाग संयुक्तपणे रेनहार्ड गेन्जेल आणि अँड्रिया गेज यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. रॉजर पेनरोझ यांनी ब्लॅक होल फॉरमेशनद्वारे जनरल थियरी ऑफ रिलेटिव्हिटीचा अंदाज लावला जाऊ शकतो, याचं संशोधन केलं आहे. तर रेनहार्ट आणि अँड्रिया यांनी आकाशगंगेच्या मध्यभागी सुपरमॅसिव्ह कॉम्पॅक्ट ऑब्जेक्टचा शोध लावला आहे. भौतिकशास्त्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचा नोबेल पारितेषिक देऊन गौरव करण्याय येणार आहे.



वैद्यकीय क्षेत्रातील नोबल पुरस्कार जाहीर, तीन शास्त्रज्ञांना 'हिपॅटायटीस सी' विषाणूच्या शोधासाठी पुरस्कार


तर 5 ऑक्टोबरला वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. हार्वे जे. अल्टर, मायकल ह्यूटन आणि चार्ल्स एम. राईस यांना जाहीर झाला आहे. ‘हिपॅटायटिस सी’ या विषाणूच्या शोधासाठी या तिन्ही शास्त्रज्ञांना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. रक्तातील ‘हिपॅटायटिस सी’ या विषाणूमुळे सिरोसिस आणि यकृताच्या कर्करोगासारखे आजार होतात. या आजारांसी लढा देण्यासाठी या तिन्ही वैज्ञानिकांनी निर्णायक योगदान दिले आहे.