अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प यांनी एक ट्विट करून कोरोनाची तुलना फ्लूशी केल्याने ट्विटरने त्यांचे ते ट्विट लाल शेरांकित केले आणि त्यांना चेतावणी देताना असे म्हंटले आहे की त्यांची ही माहिती दिशाभूल करणारी आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी हे ट्विट त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर काही तासातच केले. डोनाल्ड ट्रंम्प हे कोरोना पॉझिटिव्ह असुन नुकतेच ते मेरिलँड मधील वॉल्टर रीड नॅशनल मिलिटरी मेडिकल सेंटरमधून डिस्चार्ज घेवून व्हाईट हाऊसवर आले आहेत.
' फ्लूचा हंगाम येत आहे. यावर लस असूनही अनेक लोकांचा, काही वेळा एक लाखांवर लोकांचा या फ्लू मुळे मृत्यूमुखी पडतात. यावेळी आपण आपला देश बंद करतो का? नाही. आपण जसं कोरोनासोबत जगायला शिकत आहोत तसेच आपल्याला त्याच्या सोबत जगायला शिकलं पाहिजे.' असे ट्विट अध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प यांनी केले होते. सोमवारी ट्रम्प यांनी लोकांना कोरोनाला घाबरू नका असा संदेश दिला होता. ते अजूनही कोरोना पॉझिटिव्ह असले तरी त्यांनी फोटो देण्यासाठी त्यांच्या चेहऱ्यावरील मास्क काढला होता. सीएनएनच्या एका वृ्त्तानुसार आदल्या दिवशी फेसबुकनेही त्यांच्या वॉलवरून डोनाल्ड ट्रंप यांची यासंबंधीची पोस्ट काढून टाकली होती.
2019-20 च्या एनफ्लूएंझा हंगामात फ्लूमुळे जवळपास 22,000 लोकांचा मृत्यू झाला होता असे अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज् कंट्रोल अँड प्रिव्हेंशनचा अहवाल सांगतो. कोरोना व्हायरसमुळे एकट्या अमेरिकेत दोन लाखांहून जास्त लोकांनी आपला जीव गमावला आहे.
अमेरिकेची फर्स्ट लेडी मेलिनिया ट्रंम्प यांच्यासहित व्हाईट हाऊस मधील अनेक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सोमवारी व्हाईट हाऊसच्या सेक्रेटरी केलेग मॅकेनी यांनीही त्या कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्याचे सांगितले.य
याआधीही आपल्या ट्विटत आणि फेसबुक या सोशल माध्यंमावरच्या वेगवेगळ्या पोस्टमुळे ़डोनाल्ड ट्रंम्प अनेकदा अडचणीत आले आहेत. त्यावर त्यांना अनेकदा टीकेचा भडिमार सहन करावा लागला आहे. यापूर्वी फेसबुकने त्यांच्या अनेक वादग्रस्त पोस्ट काढून टाकल्या आहेत तसेच ट्विटरनेही त्यांच्या बऱ्याच वादग्रस्त ट्विटना लाल झेंडा दाखवला आहे.
डोनाल्ड ट्रंम्प यांनी सुरवातीपासूनच कोरोनाला गांभीर्याने घेतले नसल्याचे अनेक स्तरातून बोललं जातय. ते ज्या-ज्या वेळी पत्रकार परिषदेला सामोरे जायचे तेंव्हा ते स्वत: कधीही मास्क वापरायचे नाहीत. त्यांच्या या कृत्यावर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. काही दिवसांपूर्वीच त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
कोरोनाची फ्लू बरोबर तुलना केल्याने ट्रम्प यांच्या ट्विटवर कारवाई
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Oct 2020 11:56 AM (IST)
आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिध्द असलेले अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प यांनी नवीन ट्विट करून कोरोनाची तुलना फ्लूशी केली आहे. त्यांच्या या ट्विटला रेड फ्लॅग देवून ट्विटरने त्यांच्यावर कारवाई केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -