मुंबई: नोबेल पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली असून स्वीडनचे शास्त्रज्ञ स्वांते पाबो (Svante Paabo) यांना यंदाच्या वैद्यकीय क्षेत्रातल्या नोबेल (Nobel Prize in Medicine) पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. लुप्त झालेल्या होमिनिन आणि मानवी उत्क्रांतीमधील जीनोम (for his discoveries concerning the genomes of extinct hominins and human evolution) संबंधित अभ्यासाबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 


 







स्वीडनचे स्वांते पाबो हे एक जेनेटिस्ट (Geneticist) असून ते मानवी उत्क्रांतीसंबंधी संशोधन करतात. ते पॅलिओजेनेटिक्सच्या संस्थापक शास्त्रज्ञांपैकी एक असून त्यांनी निअॅन्डरथल जीनोमवर मोठ्या प्रमाणात संशोधन केलं आहे. त्यांच्या नावाची घोषणा करताना नोबेल पुरस्कार समितीने म्हटलं आहे की, आपल्या संशोधनातून स्वांते पाबो यांनी असं काही केलं आहे की जे या आधी अशक्य समजलं जायचं. निअॅन्डरथल जीनोमचा क्रम ठरवणे हे त्यांचे मोठं संशोधन आहे. निअॅन्डरथल जीनोम सध्या लुप्त झालं आहे. स्वांते पाबो यांनी होमिनिन डेनिसोवा यासंबंधितही संशोधन केलं आहे. 


होमिनिन्स जीन्स सध्या झालेले आहेत. पण त्यांचे हस्तांतर होमो सेपियन्समध्ये झाल्याचा शोध स्वांते पाबो यांनी लावला आहे. जुन्या जीन्सचे आताच्या पीढीपर्यंत हस्तांतर झाल्याचं स्पष्ट झालं आहे. 






महत्त्वाच्या बातम्या :