मुंबई : यंदाचा प्रतिष्ठित अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार सोमवारी जाहीर करण्यात आला.अमेरिकेचे डेविड कार्ड, जोशुआ डी अंग्रिस्ट आणि गुइडो इम्बेन्स यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. 'स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेस' च्या समितीने ही घोषणा केली आहे.
Nobel Peace Prize 2021: यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार मारिया रेसा आणि दिमित्री मुराटोव्ह यांना जाहीर
गेल्या वर्षी ऑक्शन थिअरीमध्ये (लिलाव सिद्धांत) सुधारणा आणि लिलावाच्या नव्या पद्धतींचा शोध लावल्याबद्दल र पॉल आर मिलग्रोम आणि रॉबर्ट बी विल्सन यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. नोबेल पुरस्काराने सन्मानि करण्यात आलेले हे तीन अर्थतज्ज्ञ अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये अध्यापनाचे, संशोधनाचे कार्य करत आहेत. कॅलिफोर्निया विद्यापीठात डेव्हिड कार्ड, मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये जोशुआ डी एंग्रिस्ट आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठात गुइडो इम्बेन्स हे कार्यरत आहेत.
तत्पूर्वी, शुक्रवारी फिलिपिन्सच्या पत्रकार मारिया रेसा (Maria Ressa) आणि रशियन पत्रकार दिमित्री मुराटोव्ह (Dmitry Muratov) यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी त्यांच्या संघर्षासाठी 2021 चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.
Nobel Prize in Literature 2021: कादंबरीकार अब्दुलरझाक गुर्ना यांना यंदाचं साहित्यातील नोबेल! जाणून घ्या का दिला सन्मान
नोबेल पुरस्काराचा इतिहास
नोबेल पुरस्कार नोबेल फाऊंडेशनकडून दिला जातो. स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हे पुरस्कार दिले जातात. अल्फ्रेड नोबेल यांनी मृत्यू आधी आपल्या संपत्तीचा मोठा हिस्सा एका ट्रस्टला दान केला होता. त्यांची इच्छा होती की या पैशांच्या व्याजातून दरवर्षी विविध क्षेत्रात भरीव योगदान देण्याऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जावा. अल्फ्रेड नोबेल यांची संपत्ती स्वीडिश बँकेत जमा आहे. या संपत्तीच्या व्याजातून दरवर्षी नोबेल पुरस्कार दिले जातात. पहिल्या नोबेल शांती पुरस्कार 1901 मध्ये देण्यात आला होता.