नवी दिल्ली : यंदाच्या वर्षाचे रसायनशास्त्रील (Chemistry)  नोबेल पुरस्काराची(Nobel Prize) आज घोषणा झाली. बेंजमिन लिस्ट (Benjamin List)  आणि डेविड डब्ल्यूसी मॅकमिलन (David WC MacMillan) यांचा नोबेल पुरस्काराने गौरव केला जाणार आहे. 'स्वीडिश अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस' च्या समितीने ही घोषणा केली आहे. सेंद्रिय उत्प्रेरकांच्या शोधकर्त्यांना यंदाचानोबेल पुरस्कार देण्यात येणार आहे.  गेल्या वर्षी जीनोम एडिटिंगच्या पद्धतीचा शोध लावल्याबद्दल  इमॅन्युएल चार्पेंटिअर आणि जेनिफर ए. डॉडना हा पुरस्कार देण्यात आला होता. 


Noble Prize | स्यूकुरो मानेबे, क्लॉस हॅसलमन और ज्योर्जियो पेरिसिक यांना भौतिकशास्त्रातील नोबेल


ऑर्गेनोकॅटिलिसिस क्षेत्रात आश्चर्यकारक गतीने विकास होत आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या नव्या संशोधनामुळे  रासायनिक अभिक्रियांचा वेग पर्यावरणपूरक पद्धतीने, कमी खर्चात वाढवणे शक्य झाले. या पुरस्कारामध्ये सुवर्ण पदकासह 11 लाख डॉलर्सपेक्षा जास्त रोख पारितोषिक आहे. हा पुरस्कार स्वीडिश शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या नावे देण्यात आला आहे.


 






Nobel Prize 2021 in Medicine : डेव्हिड ज्युलिअस आणि अॅर्डेम पटापाउटियन यांना औषधशास्त्रामध्ये नोबेल


काल भौतिकशास्त्रील नोबेल पुरस्काराची  घोषणा झाली. स्यूकुरो मानेबे, क्लॉस हॅसलमन आणि ज्योर्जियो पेरिसिक यांचा नोबेल पुरस्काराने गौरव केला जाणार आहे. द रॉयल स्वीडिश अॅकेडमी ऑफ सायन्सतर्फे  हा पुरस्कार हवामान आणि क्लिष्ठ भौतिक प्रणालीतील (complex physical system) संशोधनासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. 


नोबेल पुरस्काराचा इतिहास


नोबेल पुरस्कार नोबेल फाऊंडेशनकडून दिला जातो. स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हे पुरस्कार दिले जातात. अल्फ्रेड नोबेल यांनी मृत्यू आधी आपल्या संपत्तीचा मोठा हिस्सा एका ट्रस्टला दान केला होता. त्यांची इच्छा होती की या पैशांच्या व्याजातून दरवर्षी विविध क्षेत्रात भरीव योगदान देण्याऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जावा. अल्फ्रेड नोबेल यांची संपत्ती स्वीडिश बँकेत जमा आहे. या संपत्तीच्या व्याजातून दरवर्षी नोबेल पुरस्कार दिले जातात. पहिल्या नोबेल शांती पुरस्कार 1901 मध्ये देण्यात आला होता.