मुंबई : कोरोना व्हायरसने संपूर्ण जग वेठीला धरलं आहे. अनेक देशांमध्ये कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच कोरोनावर प्रभावी लस तयार करण्यासाठी जगभरातील अनेक शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहे. कोरोनामुळे दैनंदिन जीवनात प्रचंड बदल घडून आला आहे. कोरोनामुळे तोंडावर लावलेल्या मास्कचा सर्वांनाच क्षीण आला आहे. कधी कोरोना जातोय आणि कधी एकदा तोंडावरचं मास्क बाजूला सारतोय असं सर्वांच्याच मनातील इच्छा आहे. अशातच कोरोना लवकरच नाहीसा होणार, यासंदर्भात पुन्हा एकदा आशा पल्लवीत झाल्या आहेत. यामागील कारण म्हणजे, एका डॉक्टरांची फेसबुकवरील पोस्ट.


सोशल मीडियावर युएईमधील गायनॅकोलॉजिस्ट असणाऱ्या डॉ. सामीर चेईब  यांनी शेअर केलेला एका नवजात बाळाचा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये जन्माला आल्यानंतर अवघ्या काही क्षणांमध्ये हे बाळ डॉक्टरांच्या तोंडावरील सर्जिकल मास्क ओढताना दिसत आहे. तर डॉक्टर या कृतीवर हसताना दिसत आहेत.


व्हायरल झालेला हा फोटो खूपच आशादायी असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.  हा फोटो म्हणजे लवकरच आपल्याला मास्क न घालता फिरावं लागेल असं शुभसंकेत असल्याचं मतही अनेकांनी व्यक्त केलं आहे.


हा फोटो युएईमधील गायनॅकोलॉजिस्ट असणाऱ्या डॉ. सामीर चेईब यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला आहे. बाळाला गर्भशयामधून बाहेर काढल्यानंतर त्याने डॉक्टरांचे मास्क पकडलं आणि ते ओढू लागलं. यामुळे डॉक्टरांनाही हसू आवरता आलं नाही. 'आपल्या सर्वांनाच आपण लवकरच मास्क काढू यासंदर्भातील संकेत हवे आहेत' असं कॅप्शन देत डॉक्टरांनी हा फोटो शेअर केला आहे.