एक्स्प्लोर

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेव्हा 11 वर्षीय विद्यार्थिनीची लाच नाकारतात...

ड्रॅगन्सबाबत संशोधन करण्यासाठी आपल्या टेलिकायनेटिक शक्ती प्रदान कराव्यात अशी अजब मागणी न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांना व्हिक्टोरिया नावाच्या विद्यार्थिनीने पत्रातून केली होती.

वेलिंग्टन : न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी 11 वर्षीय विद्यार्थिनीने पाठवलेली लाच नाकारली. ड्रॅगनबाबत संशोधन करण्याची बालसुलभ मागणी करत या चिमुरडीने नाममात्र रक्कम पाठवली होती. ड्रॅगन्सबाबत संशोधन करण्यासाठी आपल्या टेलिकायनेटिक शक्ती प्रदान कराव्यात अशी अजब मागणी व्हिक्टोरिया नावाच्या विद्यार्थिनीने पत्रातून केली होती. पत्रासोबत तिने पाच न्यूझीलंड डॉलर (अंदाजे 230 रुपये) पाठवले होते. टेलिकायनेटिक म्हणजेच अंतर्मनाच्या शक्तीने वस्तू हलवण्याची क्षमता. जेसिंडा आर्डर्न यांचं विनम्र उत्तर 'सायकिक आणि ड्रॅगनबाबत तुझ्या सूचना ऐकून आम्हाला कुतूहल वाटलं. मात्र दुर्दैवाने आम्ही याबाबत कोणतंही संशोधन कार्य करत नाही आहोत. त्यामुळे मी तू पाठवलेली लाच परत करत आहे. भविष्यात टेलिकायनेसिस, टेलिपथी आणि ड्रॅगन या विषयावर संशोधन करण्यासाठी तुला शुभेच्छा' अशा आशयाचं उत्तर अधिकृत लेटरहेडवरुन जेसिंडा यांनी हस्ताक्षरात पाठवलं.
पदावर असताना प्रसुत होणाऱ्या न्यूझीलंडच्या पहिल्या पंतप्रधान
विशेष म्हणजे, या चिमुरडीच्या बालसुलभ कुतूहलाला धक्का पोहचणार नाही, याची पुरेपूर काळजीही अॅडर्न यांनी घेतली. पत्राखाली ताजा कलम लिहिताना 'मी त्या ड्रॅगन्सवर डोळा ठेवून असेन, ते सूट्स घालतात का?' असा प्रश्न आर्डर्न यांनी विचारला. नेटफ्लिक्सवरील 'स्ट्रेंजर थिंग्स' या साय-फाय सिरीजमुळे व्हिक्टोरियाला या विषयात रस निर्माण झाल्याचं तिच्या मोठ्या भावाने सांगितलं. जेसिंडा यांचा अल्प परिचय जेसिंडा आर्डर्न या पदावर असताना प्रसुत झालेल्या न्यूझीलंडच्या पहिल्या पंतप्रधान आहेत. बॉयफ्रेण्ड आणि टेलिव्हिजन प्रेझेंटर क्लार्क गेफोर्ड यांच्यासोबत जेसिंडा यांचा नुकताच साखरपुडा झाला. आर्डर्न यांच्या मुलीचा जून 2018 मध्ये जन्म झाला होता. त्यांची मुलगी नीव्ह आता दहा महिन्यांची आहे. न्यूझीलंडमध्ये 1893 साली महिलांना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता. आर्डर्न या देशाच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान आहेत. 2016 साली पंतप्रधानपदाची सूत्रं हाती घेताना आर्डर्न या पंतप्रधानपदी विराजमान होणाऱ्या न्यूझीलंडच्या सर्वात तरुण व्यक्ती ठरल्या होत्या. पंतप्रधानपद काबीज करण्याच्या अवघ्या सहाच दिवस आधी त्यांना आपण गरोदर असल्याचं समजलं होतं. पदावर असताना प्रसुत होणाऱ्या त्या न्यूझीलंडच्या पहिल्याच, तर जगभरातील दुसऱ्याच पंतप्रधान (किंवा लोकशाही पद्धतीने नियुक्त सर्वोच्च पदावरील व्यक्ती) ठरल्या आहेत. यापूर्वी 1990 मध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांनी पदावर असताना बाळाला जन्म दिला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump: अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
Pakistan News: पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
Israel-Hamas Gaza War: मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार
मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती
Nepal Violence: कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
Donald Trump: अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
Nashik Heavy Rain : नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
Arbaaz Sheikh Father Death Post: 'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
Pakistan News: पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
Embed widget