मुंबई: टीबीच्या आजारातील एक नवा विषाणू सापडला आहे. संशोधनकर्त्यांनी मानवी शरीरात होणाऱ्या टीबीच्या संक्रमणावर अध्ययन करून हा नवा विषाणू शोधला आहे. मायक्रोफोल्ड सेल ट्रांसलोकेशनचा असे याचे नामकरण करण्यात आले आहे. या संशोधनकर्त्यांच्या टीममध्ये काही भारतीयांचाही समावेश आहे.

 

मायकोबॅक्टेरियम ट्यूबरकुलोसिस (एमटीबी) हा आजार श्वसनाने संक्रमित होतो असे समजले आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या या संशोधनानुसार, मायक्रोफोल्ड सेल ट्रांसलोकेशनचा नवीन विषाणू समोर आला आहे.

 

द युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास साउदर्न मेडिकल सेंटरमधील पोस्ट डॉक्टरेट करणाऱ्या विद्या नायक यांचा हा शोध ऑनलाईन कोशिका रिपोर्ट जर्नलमध्ये प्रकशित झाला आहे.

 

एमटीबीचा जीवाणू श्वसनाद्वारे तुमच्या शरीरात जातो. यानंतर हा जिवाणू फुफुसापर्यंत पोहचून शरीरातील मायक्रोफेज खाण्यास सुरुवात करत असल्याचे या विद्यापीठातील प्रध्यापक प्रोफेसर मायकल शिलोह यांनी सांगितले.

 

मायक्रोफेज या शरीरातील पांढऱ्यापेशी असून त्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती चांगली राहते.

 

शिलोह यांनी सांगितले की, एमटीबी हा जिवाणू श्वसनाद्वारे प्रवेश करत असल्याने, एम कोशिकाच्या माध्यमातून शरीरात थेट प्रवेश करून लिंफ नोड आणि शरिरातील इतर भागात पोहोचतो. एम कोशिका या विशिष्ट प्रकारचे अॅपिथिलियल पेशी आहे. च्यामुळे म्यूकोसलच्या माध्यमातून पेशींच्या आत प्रवेश करून कार्यरत होतो.

 

द युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास साउदर्न मेडिकल सेंटरनुसार जगभरातील एक तृतीयांश रुग्ण हे टीबीच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यामुळे यावरील उपाय शोधण्याचे काम सुरु आहे.