न्यूयॉर्क : इंटरनेट जगतात लोकप्रिय ठरलेली याहू कंपनीचा आता व्यवहार होत आहे. ही कंपनी अमेरिकेची व्हेरीझॉन टेलिकॉम विकत घेणार आहे. व्हेरीझॉन 4.8 बिलियन डॉलरमध्ये याहूला खरेदी करणार आहे.


 

याहू कंपनी 1994 मध्ये सुरु झाली होती. तेव्हापासून याहू इंटरनेटसाठीही पर्याय ठरली होती. मात्र काळानुसार अपडेट न राहिल्यामुळे याहू मागे पडत गेलं.

 

गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेल्या स्पर्धेमुळे याहूसमोर मोठी समस्या निर्माण झाली होती. गुगलने सर्वात मोठं आव्हान याहूसमोर उभं केलं होतं. याहू मेल आणि मेसेजिंग सेवेचे युजर्स गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणावर घटले होते. त्यामुळे कंपनी आपोआपच मागे पडत गेली.

 

दरम्यान याहूला खरेदी करणारी व्हेरीझॉन ही अमेरिकेतील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असून सर्वात मोठी इंटरनेट कंपनी म्हणूनही पुढे येत आहे. व्हेरीझॉन याहूला 4.8 बिलियन डॉलरमध्ये खरेदी करणार असून लवकरच हा व्यवहार केला जाणार आहे.

 

सूत्रांच्या माहितीनुसार याहू आपली ईमेल सर्व्हिस, बातम्यांचे पोर्टल, आर्थिक आणि खेळविषयक पोर्टल व्हेरीझॉन कंपनीला विकणार आहे.

 

याहूने 2005मध्ये फ्लिकर ही वेबसाईट खरेदी केली होती. सध्या फक्त फ्लिकर हे एकच फायदेशीर साधन याहूकडे आहे.