एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली पद मुक्त, सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव पारित, कम्युनिस्ट पार्टीचं सरकार बरखास्त
Nepal PM KP Sharma Oli : नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली पद मुक्त झाले आहेत. पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव पारित झाला आहे. यामुळं नेपाळमधील कम्युनिस्ट पार्टीचं सरकार बरखास्त झालं आहे.
Nepal PM KP Sharma Oli : नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली पद मुक्त झाले आहेत. पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव पारित झाला आहे. यामुळं नेपाळमधील कम्युनिस्ट पार्टीचं सरकार बरखास्त झालं आहे. नेपाळच्या संसदेमध्ये आवश्यक विश्वास मतं प्राप्त करण्यात अपयशी ठरल्यानंतर पंतप्रधान ओली यांचं पद सोमवारी रद्द झालं.
नेपाळ संसदेतील प्रतिनिधी सभेमध्ये अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. यावेळी निर्णायक मतं मिळवण्यात पंतप्रधान ओली अपयशी ठरले त्यांना केवळ 93 मतं प्राप्त झाली. पंतप्रधान यांच्या विरोधात 124 मत पडली. प्रतिनिधी सभेत सोमवारी मतदान प्रक्रियेत एकूण 232 खासदारांनी सहभाग घेतला. त्यापैकी 15 खासदार तटस्थ राहिले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
निवडणूक
आरोग्य
Advertisement