Nepal Helicopter Accident:  नेपाळमध्ये  झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात  सहा जणांचा मृत्यू झाला आहे.सहा प्रवाशांना घेऊन निघालेलं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं आणि आता त्याचे अपघातग्रस्त अवशेष हाती लागल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये पाच विदेशी नागरिक प्रवास करत होते.
 
नेपाळच्या शोध पथकाने अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचा अवशेष हाती लागली आहे. कोशी प्रांताचे डीआयजी राजेशनाथ बस्तोला यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार,लिखु पीके ग्राम परिषद आणि दुधकुंडा नगर पालिका-2 यांच्या सीमाभागात या हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले. त्या परिलरातील ग्रामस्थांनी हेलिकॉप्टर पडल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.  हेलिकॉप्टरने सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी मनांग एअरच्या हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते. त्यानंतर 15 मिनिटांनी हेलिकॉप्टरशी संपर्क तुटला.  प्राथमिक माहितीनुसार मंगळवारी सहा प्रवाशांना घेऊन निघालेलं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं आणि आता त्याचे अपघातग्रस्त अवशेष सापडले.  






असा झाला अपघात


पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिकीनुसार मनांग एअरच्या हेलिकॉप्टरचा मंगळवारी सकाळी संपर्क तुटला. सोसुखुम्बु जिल्ह्यातील लिखूपिकेच्या ग्रामीण  नगरपालिकेच्या लमजुरा येथे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाली. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हेलिकॉप्टर डोंगराला जाऊन धडकले.त्यामुळे ही घटना घडली आहे. राजेशनश बस्तोला यांनी म्हटले आहे की, हाती लागलेल्या मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही. मनांग एअर संचालनच्या राजू न्यूपेन यांनी  दिलेल्या माहितीनुसार हेलिकॉप्टरमध्ये कॅप्टन चेत बहादूरसह पाच मेक्सिकन नागरिक होते. सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.


अचानक तुटला संपर्क


दुर्घटनाग्रस्त झालेल्या हेलिकॉप्टरमध्ये पाच विदेशी पर्यटक सर्वात उंच शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टवर पर्यटनासाठी जात होते. रिपोर्टनुसार, हेलीकॉप्टर सोलुखुम्बू आणि काठमांडू यात्रेदरम्यान हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला.द काठमांडू पोस्टच्या रिपोर्टनुसार, सकाळी 10.15 वाजता हेलिकॉप्टरचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. उंच डोंगरांमुळे नेपाळमध्ये विमान दुर्घनेच्या बातम्या येत असतात. 


खराब हवामानामुळे दृष्यमानता कमी


सध्या देशातील विविध भागात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळं खराब हवामानामुळे दृष्यमानता कमी झाली आहे. अनेक राज्यात खबार हवामानामुळं हवाई उड्डाण आणि वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे अनेक राजकीय नेत्यांचे हेलिकॉप्टरचे एमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. 


हे ही वाचा :


Malegaon Wedding : नवरदेव नवरीची 'हेलिकॉप्टर' मधून ग्रँड एन्ट्री... मालेगावमध्ये आदिवासी कुटुंबातील शुभमंगल सावधान!