एक्स्प्लोर

'अफगाण गर्ल' शरबत गुलाला पाकिस्तानात अटक

इस्लामाबाद : 1985 नॅशनल जिओग्राफिक मॅगझिनच्या कव्हरपेजवर झळकलेली विस्मयकारी डोळ्यांची मलिका शरबत गुलावर गजाआड जाण्याची नामुष्की ओढावली आहे. अफगाणिस्तानातून शरणार्थी म्हणून पाकिस्तानात दाखल झालेल्या शरबतवर बनावट ओळखपत्र बनवून पाकिस्तानात अवैध वास्तव्य केल्याचा आरोप आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या चौकशीनंतर शरबत गुलाची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या तपास अधिकाऱ्यांनी बुधवारी पेशावरमधील घरातून शरबत गुलाला अटक केली. पाकिस्तानने नुकतीच बनावट ओळखपत्रांविरोधात कारवाई सुरु केली आहे. पाकिस्तानात हजारोंच्या संख्येने अफगाणिस्तानमधून आलेले शरणार्थी राहत आहेत. पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार शरबत गुलाने शरबती बीबी नावाने एप्रिल 2014 मध्ये ओळखपत्रासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी शरबत अफगाणिस्तानातील गावात पती आणि तीन मुलींसह राहत होती. त्यानंतर ती पाकिस्तानच्या पेशावरमध्ये राहू लागली. शरणार्थींविरोधात पाकिस्तान सरकारची मोहीम मागील काही दिवसांपासून बनावट ओळखपत्र बनवून पाकिस्तानात राहत असलेल्या परदेशी नागरिकांविरोधात सरकारने मोहीम उघडली आहे. या मोहीमेत 60,675 लोकांना बनावट ओळखपत्रासह पकडलं आहे, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. कोण आहे शरबत गुला? Sharbat_Gula 1984 साली स्टीव्ह मॅक्युरी या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या छायाचित्रकाराने पाकिस्तानमधील रेफ्यूजी कॅम्पमध्ये एका 12 वर्षीय किशोरवयीन तरुणीचा फोटो काढला होता. त्या फोटोतील हिरव्या डोळ्यांनी जगभराचं लक्ष वेधलं होतं. पण त्या फोटोनंतर शरबत गुलाचा कोणताही ठावठिकाणा नव्हता. पण तब्बल 17 वर्षांनंतर स्टीव्ह मॅक्युरी यांनी पुन्हा पाकिस्तानमध्ये तिचा शोध घेतला आणि शरबत गुला पुन्हा एकदा जगासमोर आली होती. 'द अफगाण गर्ल' नावाने परिचित असणाऱ्या शरबत गुलाची तुलना लिओनार्डो दा विन्चीच्या 'मोनालिसा' सोबतही केली जात होती. शरबत गुलाने एका बेकरशी लग्न केलं असून ती तीन मुलींची आई आहे. शरबतची हरतऱ्हेने मदत करणार : स्टीव्ह मॅक्युरी Sharbat_Gula_2 दरम्यान, शरबत गुलाची हरतऱ्हेने मदत करणार, असा निर्धार छायाचित्रकार स्टीव्ह मॅक्युरी यांनी केला आहे. मी त्या परिसरातील माझ्या मित्रांच्या संपर्कात असून सगळ्याप्रकारे प्रयत्न करत आहे. शरबत आणि तिच्या कुटुंबाला कायदेशीर आणि आर्थिक मदत उपलब्ध करुन देण्यासाठी मी वचनबद्ध आहे, अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. शरबतने आयुष्यभर अनेक अडचणींचा सामना केला आहे, असं मॅक्युरी यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

Pakistan Blast: पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग, 5 जणांचा मृत्यू, तर 41 जण बेपत्ता, 225 जणांना वाचवण्यात यश
इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग, 5 जणांचा मृत्यू, तर 41 जण बेपत्ता, 225 जणांना वाचवण्यात यश
CWG 2026: 'ईशान्य भारत अन् काश्मीर गायब'; ग्लासगोतील रेस्टॉरंटच्या नॅपकिनवर भारताचा अपूर्ण नकाशा, स्टार बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन आणि BFI चा तीव्र आक्षेप
'ईशान्य भारत अन् काश्मीर गायब'; ग्लासगोतील रेस्टॉरंटच्या नॅपकिनवर भारताचा अपूर्ण नकाशा, स्टार बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन आणि BFI चा तीव्र आक्षेप
Middle East Crisis: 'मिडल ईस्ट सोडा', अमेरिकेकडून नागरिकांना महत्त्वाचा अलर्ट, इराणसोबतच्या तणावात मोठा भडका उडणार?
'मिडल ईस्ट सोडा', अमेरिकेकडून नागरिकांना महत्त्वाचा अलर्ट, इराणसोबतच्या तणावात मोठा भडका उडणार?

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe Marathi News: तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
Tukaram Mundhe Marathi News: Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
By Poll Election: विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायव्होल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायव्होल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
Bankipur By-election Prashant Kishor: पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
Nashik Potholes: 'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
Abhijeet Dipke on PM Modi: आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
Embed widget