Memory Loss :  पत्नीसोबत शरीर संबंध ठेवल्यानंतर काही मिनिटातच एका व्यक्तीला स्मृतीभ्रंश झाला असल्याची अजब घटना समोर आली. आयर्लंडमध्येही घटना घडली आहे. आयरिश मेडिकल जर्नलच्या मे महिन्याच्या अंकात या प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे. पीडित रुग्णाची अवस्था पाहता त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 


आयरिश मेडिकल जर्नलमध्ये या आजाराला ट्रान्झिस्ट ग्लोबल एम्नेसिया (Transient Global Amnesia)असे म्हटले आहे. यामुळे तात्पुरत्या स्वरुपातील स्मृतीभ्रंशाच्या आजाराचा सामना करावा लागतो. मात्र, शरीरसंबंध ठेवल्यानंतर हा आजार होणे ही दुर्मिळ घटना असल्याचे म्हटले जात आहे. 


शरीरसंबंध ठेवल्यानंतर 10 मिनिटात स्मृती गेली


मेयो क्लिनिकलने Transient Global Amnesia ला अचानकपणे शार्ट टर्म मेमरी लॉस असल्याचे सांगितले. हा एक आजार असून पक्षाघात, ब्रेन स्ट्रोक सारख्या कारणांमुळे होत नाही. मेडिकल जर्नलमध्ये दिलेल्या माहितीनुसार, या आयरिश व्यक्तिने संभोगाच्या 10 मिनिटाच्या आत त्याला स्मृतीभ्रंशाचा सामना करावा लागला. या 66 वर्षीय व्यक्तीने 2015 मध्येदेखील स्मृतीभ्रंशाचा सामना केला होता. त्यावेळी देखील शरीरसंबंध ठेवल्यानंतर स्मृतीभ्रंशाचा सामना करावा लागला. मात्र, काही दिवसात स्मृतीभ्रंशाचा आजार दूर झाला होता. 


एक दिवसापूर्वी साजरा केलेला लग्नाचा वाढदिवस विसरला


ही घटना घडण्यापूर्वी या व्यक्तीने पत्नीसोबत शरीरसंबंध ठेवले होते. त्यानंतर त्याने फोनवर तारीख पाहिली आणि अस्वस्थ झाला. आपल्या लग्नाचा वाढदिवस आपण विसरलो, असे त्यांना वाटू लागले. एक दिवसापूर्वीच त्याने आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला होता. मात्र, त्याला याबाबत काहीच लक्षात नव्हते. मात्र, त्याला काही वर्षांपूर्वीचा लग्नाच्या वाढदिवस लक्षात होता. या व्यक्तीने पत्नी आणि मुलीला लग्नाच्या वाढदिवसाबाबत आणि मागील काही दिवसांच्या घटनांबाबत सारखी-सारखी विचारणा केली होती. 


50 ते 70 वयोगटातील व्यक्तींना आजार


साधारणपणे एका दुर्मिळ स्थितीत 50 ते 70 या वयोगटातील लोकांना हा आजार होण्याची अधिक शक्यता असते. या आजारामुळे काही दिवसांपूर्वीच्याच घटना विस्मृतीत जातात. एका डॉक्टराने सांगितले की,  या आजाराची बाधा झालेल्या व्यक्तींना कदाचित एक वर्षापूर्वीच्या घटना लक्षात राहू शकत नाही. मात्र, त्यानंतरही या आजाराने ग्रासलेल्या व्यक्तींना काही तासांत पुन्हा स्मृती येते. 


कोणत्याही स्थिती होऊ शकतो आजार


आयरिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या रिसर्च पेपरचे लेखक आणि युनिर्व्हसिटी हॉस्पिटल लिमेरिकमधील न्यूरोलॉजी विभागातील डॉक्टरांनी सांगितले की, हा दुर्मिळ आजार आहे. अचानकपणे शारिरीक काम करणे,  थंड अथवा गरम पाण्याच्या संपर्कात येणे, भावनात्मक ताण-तणाव, वेदना आणि संभोगानंतर हा आजार होऊ शकतो.