NASA : अमेरिकेची स्पेस एजन्सी नासाच्या इनसाइट लँडरला मंगळावर भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नासाने दिलेल्या माहितीनुसार, इनसाइट लँडरला 4 मे 2022 रोजी आपल्या मंगळ ग्रहावरील प्रवासाच्या 1222 व्या दिवशी पाच तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. इनसाइट लँडर नोव्हेंबर 2018 पासून मंगळाच्या पृष्ठभागावर उतरले आहे.  मंगळाच्या पृष्ठभागावर उतरल्यापासून इनसाइटने मंगळाच्या पृष्ठभागावर 1313 भूकंपाची ठिकाणे शोधली आहेत.  


मंगळाच्या खोलीचा अभ्यास करण्यासाठी इनसाइटमध्ये अत्यंत संवेदनशील सिस्मोमीटर (भूकंप मापक) बसवण्यात आले आहेत. या सिस्मोमीटरनेच मंगळावरील 1313 भूकंप शोधून काढले आहेत. या भूकंपाचे धक्के मंगळाच्या पृष्ठभागावर आवरणातून आणि खोलीसह वेगवेगळ्या स्तरांमधून जात असताना त्यात बदल होतील. याचाच अभ्यास करून भूकंपशास्त्रज्ञांना मंगळाच्या पृष्ठभागाखालील प्रत्येक थराची खोली आणि रचना जाणून घेता येईल.
 
नासाने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. नासाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मंगळाची रचना जाणून घेऊन शास्त्रज्ञ पृथ्वी आणि चंद्रासह जगभरातील खडकांच्या निर्मितीची प्रक्रिया जाणून घेऊ शकतील. 


ग्रहाच्या अंतर्भागाच्या खोलीचा अभ्यास करण्यासाठी फ्रेंच नॅशनल सेंटर फॉर स्पेस स्टडीज (CNES) द्वारे प्रदान केलेले अत्यंत संवेदनशील भूकंपमापक वापरून इनसाइट मंगळावर पाठवण्यात आले आहे. जेव्हा भूकंपाचे धक्के द्रव्यांमधून जातात किंवा त्यावर परावर्तित होतात, तेव्हा मंगळाचे कवच, आवरण आणि कोर या थरांची खोली व रचना निश्चित करण्यासाठी भूकंपशास्त्रज्ञ अभ्यास करण्याच्या पद्धतीत बदल करत आहेत. हे त्यांना पृथ्वी आणि चंद्रासह सर्व खडकाळ जगेची रचना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करू शकते. 


 पृथ्वीवर जाणवलेल्या भूकंपाच्या तुलनेत मंगळावरील 5 तीव्रतेचा हा भूकंप मध्यम स्वरूपाराचा भूकंप आहे. या भूकंपाचे स्थान, त्याच्या स्त्रोताचे स्वरूप आणि मंगळाच्या आतील भागाविषयी माहिती मिळवण्यासाठी शास्त्रज्ज्ञांच्या पथकाला अजून अभ्यास करावा लागेल, असे काही तज्ज्ञांचे मत आहे.  


महत्वाच्या बातम्या


Sri Lanka Crisis: सरकारी मालमत्तेचं नुकसान कोणी करत असेल तर त्यांना थेट गोळ्या घाला; संरक्षण मंत्रालयाचा लष्कराला आदेश