जेरुसलेम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्त्रायल दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. नरेंद्र मोदी आज मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्यातून थोडक्यात बचावलेला चिमुकला मोशेची भेट घेणार आहेत.
नऊ वर्षांपूर्वी 26/11 हल्ल्यादरम्यान, दक्षिण मुंबईतील नरिमन हाऊसस्थित छाबड हाऊसमध्ये दहशवाद्यांच्या हल्ल्यात मोशेचे आई-वडील रॅबी गॅव्रिएल आणि रिवाक होल्त्झबर्ग यांच्यासह आठ जण मृत्यूमुखी पडले होते.
त्यावेळी दोन वर्षांचा असलेल्या मोशेला त्याची आया सँड्रा सॅम्युअल्स यांनी वाचवलं होतं. मोशे आता साडेदहा वर्षांचा झाला असून इस्त्रायलमध्ये आजोबा-आजीसोबत राहत आहे. सँड्रा सॅमुअल्सही आता इस्त्रायलमध्येच राहतात.
इस्रायल सरकारने सँड्रा सॅम्युअल यांना मानद नागरिकता दिली आहे, जेणेकरुन त्या तिथे मोशेसोबत राहू शकतील. मोशेसोबत त्यांचं खास नातं आहे.