किंग डेव्हिड हॉटेलचे संचालक शेल्डन रिट्ज म्हणाले की, मोदींच्या रुमवर कोणत्याही प्रकारचा बॉम्ब किंवा केमिकल हल्ल्याचा परिणाम होऊ शकत नाही.
रिट्ज म्हणाले की, "जर हॉटेल बॉम्बने उडवलं तरी त्यांच्या रुमचं कोणतंही नुकसान होणार नाही. नरेंद्र मोदी आणि भारताच्या प्रतिनिधीमंडळाच्या वास्तव्यासाठी हॉटेलच्या 110 रुम रिकाम्या केल्या आहेत."
"आम्ही या शतकातील प्रत्येक अमेरिकन राष्ट्राध्यक्षाचं स्वागत केलं. क्लिंटन, ओबामांपासून काही आठवड्यांपूर्वी ट्रम्प यांचंही स्वागत केलं आहे. आता आम्ही मिस्टर मोदी यांचं यजमानपद भूषवत आहोत," असं रिट्ज यांनी सांगितलं.
शेल्डन रिट्ज यांच्या माहितीनुसार, "मोदी शाकाहारी असल्याने, त्यांच्या स्वीटमध्ये ठेवलेले कूकीजही एगलेस आणि शुगरफ्री असल्याची काळजी हॉटेलने घेतली आहे. इतकंच नाही तर रुममधील फुलंही भारतीय प्रतिनिधीमंडळाच्या आवडीची असावीत याची विशेष काळजी घेण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदींच्या रुमबाबत बोलायचं झाल्यास त्यात स्वतंत्र किचन आहे. मोदींनी जर एखाद्या पदार्थाची फर्माईश केली, तर तो पदार्थ सहजरित्या बनवता येईल. किचनची जबाबदारी रीना पुष्कर्ण यांच्याकडे असून मोदींच्या आवडीनुसारच पदार्थ बनवले जात आहेत.