एक्स्प्लोर

जगातील दहा प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी, फोर्ब्सची यादी

जगातील दहा प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदींचा समावेश करण्यात आला आहे. जगप्रसिद्ध फोर्ब्स या मासिकाने ही यादी जाहीर केली आहे.

नवी दिल्ली: टाइम मासिकाच्या यादीत स्थान न मिळालेल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘फोर्ब्स’ने आपल्या यादीत स्थान दिलं आहे. जगातील दहा प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदींचा समावेश करण्यात आला आहे. जगप्रसिद्ध फोर्ब्स या मासिकाने ही यादी जाहीर केली आहे. या यादीत नरेंद्र मोदींना नववं स्थान मिळालं आहे. महत्त्वाचं म्हणजे या यादीत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन हे अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. जगातील 75 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत मोदी नवव्या क्रमांकावर आहेत. ट्रम्प तिसऱ्या नंबरवर या यादीत गेल्या चार वर्षांपासून ब्लादिमीर पुतीन पहिल्या क्रमांकावर होते. मात्र जिनपिंग यांनी त्यांना यंदा मागे टाकलं आहे. दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे तिसऱ्या तर जर्मनीच्या चान्सलर एंजेला मर्केल चौथ्या स्थानावर आहेत. अमेझॉनचे प्रमुख पाचव्या स्थानी प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत ई-कॉमर्स वेबसाईट अमेझॉनचे प्रमख जेफ बेजोस यांनी पाचवं स्थान पटकावलं आहे. यानंतर मग पोप फ्रान्सिस, बिल गेट्स, सौदी अरेबियाचा युवराज मोहम्मद बिन सलमान अल सौद, नरेंद्र मोदी, गुगलचे सीईओ लॅरी पेज यांचा नंबर आहे. फोर्ब्सच्या यादीतील 10 शक्तीशाली व्यक्ती
  1. शी जिनपिंग, अध्यक्ष, चीन
  2. ब्लादिमीर पुतीन, अध्यक्ष, रशिया
  3. डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका
  4. एंजेला मर्केल, चान्सलर, जर्मनी
  5. जेफ बेजोस, संस्थापक, अमेझॉन
  6. पोप फ्रान्सिस, धर्मगुरु, रोमन कॅथलिक चर्च
  7. बिल गेट्स, संस्थापक, बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशन
  8. सौदी अरेबियाचा युवराज मोहम्मद बिन सलमान अल सौद
  9. नरेंद्र मोदी, पंतप्रधान, भारत
  10. लॅरी पेज, गुगलचे सीईओ
या यादीत फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्ग 13 व्या स्थानी, तर अॅपलचे सीईओ टिम कुक 24 व्या, रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी 32 व्या स्थानी आहेत. फोर्ब्सच्या 75 जणांच्या यादीत मोदी आणि मुकेश अंबानी या दोघांनीच स्थान मिळवलं आहे. जगभराची लोकसंख्या जवळपास 7.5 अब्ज इतकी आहे. मात्र या 75 व्यक्तींनी जगाचं लक्ष वेधलं आहे. फोर्ब्सच्या प्रभावशाली व्यक्तींच्या वार्षिक अहवालात, प्रत्येकी 10 कोटी लोकांमागे 1 व्यक्ती प्रभावशाली व्यक्ती म्हणून निवडला जातो. ज्यांचं काम इतरांपेक्षा वेगळं आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतात मोदी आजही लोकप्रिय आहेत, असं फोर्ब्सने म्हटलं आहे. शिवाय फोर्ब्सने मोदींनी केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचाही उल्लेख केला आहे. शिवाय मोदींनी डोनाल्ड ट्रम्प, शी जिनपिंग यांची भेट घेत जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं. तसंच मोदींनी जागतिक हवामान बदलाबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरु असलेल्या प्रयत्नात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Bangladesh Violence : बांगलादेशच्या माजी कर्णधाराच्या घरावर बॉम्ब हल्ला, घर पेटवण्याचा प्रयत्न; हल्ल्यामागे शेख हसिनांचे दिल्ली कनेक्शन
बांगलादेशच्या माजी कर्णधाराच्या घरावर बॉम्ब हल्ला, घर पेटवण्याचा प्रयत्न; हल्ल्यामागे शेख हसिनांचे दिल्ली कनेक्शन
Pakistan Blast: पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग, 5 जणांचा मृत्यू, तर 41 जण बेपत्ता, 225 जणांना वाचवण्यात यश
इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग, 5 जणांचा मृत्यू, तर 41 जण बेपत्ता, 225 जणांना वाचवण्यात यश
CWG 2026: 'ईशान्य भारत अन् काश्मीर गायब'; ग्लासगोतील रेस्टॉरंटच्या नॅपकिनवर भारताचा अपूर्ण नकाशा, स्टार बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन आणि BFI चा तीव्र आक्षेप
'ईशान्य भारत अन् काश्मीर गायब'; ग्लासगोतील रेस्टॉरंटच्या नॅपकिनवर भारताचा अपूर्ण नकाशा, स्टार बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन आणि BFI चा तीव्र आक्षेप

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime Vikhroli Parksite: रात्री दोनला अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
Pune RTO: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Pune Crime: येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
Hindu Religion: देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
Pune Hinjewadi IT Park: हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
Ashok Shinde On Alka Kubal: 'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
Devendra Fadnavis Gen Z: नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
Embed widget