Nancy Pelosi Taiwan Visit : अमेरिकेन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी दक्षिण कोरियाकडे रवाना झाल्या आहेत. चीनचा इशारा धुडकावून लावत अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी काल तैवानमध्ये दाखल झाल्या होत्या. आज त्यांनी तैवानच्या राष्ट्राध्यक्षांची भेटही घेतली आणि दक्षिण कोरियाकडे रवाना झाल्या आहेत.
नॅन्सींच्या दौऱ्याला विरोध करत चीननं अमेरिकेला गंभीर इशारा दिला होता. नॅन्सी यांच्या आगमनावेळी चीननं बॉम्ब हल्ल्याची धमकी दिल्यानं तैपेईच्या विमानतळावर संपूर्ण अंधार करण्यात आला होता. दुसरीकडे पेलोसी यांच्या सुरक्षेसाठी प्रवासादरमयान अमेरिकेच्या तेरा लढाऊ विमानांचं सुरक्षा कवच करत नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये दाखल झाल्या.
पेलोसींच्या तैवान दौऱ्याचा चीनकडून निषेध करण्यात आला आहे. नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये पोहोचल्यानंतर चीनने अमेरिकेला इशारा दिला आहे. अमेरिकेनं परिणामांना तयार राहावं, अशा इशारा चीननं दिला आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीकडूम तैवानच्या सीमांवर युद्ध सराव सुरु केला. अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये असताना चीनकडून युद्धसराव करण्यात आला.
चीनचं गर्व हनन करत वर्चस्वाच्या लढाईत अमेरिकेचा विजय झाला. तैवानमध्ये आल्यानंतर नॅन्सी पेलोसींनी पहिली प्रतिक्रिया दिली. तैवान दौरा म्हणजे जिवंत लोकशाहीचं समर्थन असं नॅन्सी यांनी म्हंटलंय. शिवाय अमेरिका तैवानच्या जनतेच्या पाठिशी असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत. त्यामुळे आता चीन अमेरिकेला खरंच प्रत्युत्तर देणार का, याकडे अख्ख्या जगाचं लक्ष लागलंय.
संबंधित बातम्या :
Nancy Pelosi Taiwan Visit: 'कितीही विरोध होऊ द्या, आम्ही थांबणार नाही', नॅन्सी पेलोसींचा चीनला नाव न घेता इशारा