Global Health Emergency : जगातील 58 देशांमध्ये मंकीपॉक्स (Monkeypox) विषाणूचा धोका वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) बैठक पार पडली. या बैठकीत WHO नं निर्णय घेतला आहे की, मंकीपॉक्स विषाणू अद्याप जागतिक आरोग्य आणीबाणी (Global Health Emergency) नाही. जगभरात मंकीपॉक्स विषाणूचा वाढता संसर्ग पाहता जागतिक आरोग्य संघटनेनं आपात्कालीन बैठक बोलावली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 


जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक (Director-General of WHO) टेड्रोस रिसोर्सेस गेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी मंकीपॉक्स विषाणूच्या झपाट्यानं पसरणाऱ्या संसर्गाबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, मंकीपॉक्स व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी तात्काळ पाऊल उचलण्याची आवश्यकत आहे. पण सध्या मंकीपॉक्स विषाणूला कोरोना (Coronavirus) आणि पोलिओ (Polio) प्रमाणे जागतिक आरोग्य आणिबाणी घोषित करण्याची गरज नाही.


58 देशांमध्ये मंकीपॉक्सचा प्रसार
जगभरातील 58 देशांमध्ये मंकीपॉक्स विषाणूचं संक्रमण झालं आहे. मंकीपॉक्स विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता आता जागतिक आरोग्य समूहानं (WHN - World Health Organization) मंकीपॉक्स विषाणू संसर्गाला महामारी घोषित केलं आहे. जगभरात आतापर्यंत मंकीपॉक्स व्हायरसच्या 3 हजार 417 लोकांना संसर्ग झाला आहे. जागतिक आरोग्य समूहानं एका निवेदनात म्हटलं आहे, अनेक खंडांमध्ये मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे, हे थांबवण्यासाठी जागतिक पातळीवर पाऊलं उचलावी लागतील.






मंकीपॉक्सच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) गुरुवारी मंकीपॉक्सच्या (Monkeypox) परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महत्त्वाची बैठक बोलावली होती. मंकीपॉक्स विषाणूला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्याबाबत विचार विनिमय करण्यात आला. काही शास्त्रज्ञांच्या मते, केवळ पश्चिमेकडील देशांमध्ये मंकीपॉक्सचा प्रसार झाल्यामुळे WHO मंकीपॉक्सला जागतिल आरोग्य आणीबाणी घोषित करण्याचा विचार करत आहे. 


मंकीपॉक्सला जागतिक आणीबाणी म्हणून घोषित करणे म्हणजे संयुक्त राष्ट्र आरोग्य संघटनेला (UNO) मंकीपॉक्स विषाणूचा उद्रेक अधिक जोमानं जगभरात पसरण्याची भीती आहे. देते. कोरोना विषाणू आणि पोलिओचा नायनाट करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांप्रमाणे मंकीपॉक्स विषाणू संसर्गावरही पाऊलं उचलावी लागतील.


महत्त्वाच्या इतर बातम्या