एक्स्प्लोर
48 तासात मुंबई सोडा, पाकिस्तानी कलाकारांना मनसेची धमकी

मुंबई : उरी हल्ल्यानंतर दिल्लीतील घडामोडींना वेग आला असताना, इकडे मुंबईतही पाकिस्तानविरोधातील रोष वाढत आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांना 48 तासात भारत सोडून जाण्याचे आदेश दिले आहेत. "मुंबईत असलेल्या पाकिस्तानी कलाकारांनी पुढील 48 तासात मुंबई सोडून पाकिस्तानात जावं, अन्यथा त्यांचं शुटिंग चालू देणार नाही. त्यांनी तातडीने भारत न सोडल्यास, आम्ही शुटिंग सुरु असलेल्या ठिकाणी घुसून त्यांना आमच्या पद्धतीने पळवून लावू, असा इशारा", मनसेने दिला आहे. जम्मू काश्मीरमधील उरी इथं अतिरेक्यांनी भारतीय लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला केला होता. यामध्ये भारताचे 18 जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानची चोहोबाजूंनी कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. पाकिस्तानला दहशवादी राष्ट्र घोषीत करण्याची मागणी भारताने संयुक्त राष्ट्रांत केली आहे.
Before You Go
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय






















