Lunar Eclipse 2021 : यंदाच्या वर्षातील पहिलं पूर्ण चंद्रग्रहण 26 मे रोजी, Blood Moon पाहण्याची संधी
Lunar Eclipse 2021 : यावर्षीचं पहिलं पूर्ण चंद्रग्रहण 26 मे रोजी पाहता येणार आहे. 26 मे रोजी लागणाऱ्या चंद्रग्रहणाला Blood Moon म्हटलं जात आहे. कारण या चंद्रग्रहणा दरम्यान चंद्र लाल रंगात दिसणार आहे.
Lunar Eclipse 2021 : मे महिन्यात आपल्याला यंदाच्या वर्षीचं पहिलं चंद्रग्रहण पाहण्याची संधी मिळणार आहे. यादरम्यान, संपूर्ण चंद्र पृथ्वीच्या पाठीमागून तिची सावली होऊन जाणार आहे. यंदाच्या वर्षीचं पहिलं चंद्रग्रहण 26 मे रोजी होणार आहे.
यापूर्वी देशात 21 जानेवारी, 2019 रोजी चंद्रग्रहण लागलं होतं. 26 मे रोजी लागणाऱ्या चंद्रग्रहणाला Blood Moon म्हटलं जात आहे. कारण या चंद्रग्रहणा दरम्यान चंद्र लाल रंगात दिसणार आहे. केवळ चंद्र ग्रहणच नाही तर नासानं दिलेल्या माहितीनुसार, सोमवारपासून अवकाशात खगोलशास्त्रीय घटनांची मालिका सुरु होईल.
पूर्ण चंद्रग्रहण तेव्हा होते, जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात. चंद्रग्रहण सुरु झाल्यानंतर सर्वात आधी चंद्र काळ्या रंगाचा दिसतो, त्यानंतर हळूहळू चंद्र संपूर्ण लाल रंगाचा दिसतो. ज्याला 'ब्लड मून' (Blood Moon 2021) म्हणून संबोधलं जातं. ब्लड मून तेव्हाच दिसतो, ज्यावेळी चंद्र पृथ्वीच्या सावलीमध्ये लपतो आणि आकाशात लाल रंगाच्या प्रकाशात दिसून येतो. जगभरातील अनेक भागांत ब्लड मून 2021 दिसून येणार आहे. दरम्यान, भारतात हे पेनुम्ब्रल चंद्र ग्रहण केवळ 5 मिनिटांसाठीच दिसणार आहे.
चंद्रग्रहण किती वेळ असणार?
NASA नं दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या वर्षी Blood Moon 2021 किंवा संपूर्ण चंद्रग्रहण एकूण 3 तास 7 मिनिटांपर्यंत राहणार आहे. ज्यामध्ये अंशिक ग्रहण आणि पूर्ण चंद्रग्रहणाचा समावेश आहे. तसं पूर्ण चंद्रग्रहण 15 मिनिटांसाठी दिसणार आहे. वेळेबाबत बोलायचं झालं तर, ग्रहण 08:47am UTC (भारतीय वेळेनुसार दुपारी 2:17 वाजता) सुरु होणार आहे. तसेच पूर्ण चंद्रग्रहण 1:11am UTC (भारतीय वेळेनुसार दुपारी 4:41 वाजता) दिसणार आहे. जे 11:18pm UTC (भारतीय वेळेनुसार दुपारी 4:48 वाजेपर्यंत) असणार आहे. पूर्ण चंद्रग्रहण 01:49pm UTC ( भारतीय वेळेनुसार 7:19 वाजता) संपणार आहे.
कुठे दिसणार चंद्रग्रहण?
पूर्ण चंद्रग्रहण 2021 म्हणजेच ब्लड मून 2021 दक्षिण/पूर्वी आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिकेतील बहुतांश भागांत, दक्षिण अमेरिका, प्रशांत महासागर, अटलांटिक, हिंद महासागर आणि अंटार्कटिकामध्ये दिसून येणार आहे. काही शहरांमध्ये पूर्ण चंद्रग्रहण दिसण्याची शक्यता आहे. यामध्ये होनोलूलू, ह्यूस्टन, लॉस एंजिल्स, मनीला, मेलबर्न, सॅन फ्रांसिस्को, सियोल, शांघाई आणि टोक्योचा समावेश आहे. तसेच बँकॉक, शिकागो, ढाका, मॉन्ट्रियल, न्यूयॉर्क, टोरंटो आणि यांगून यांसारख्या शहरांमध्ये चंद्रग्रहण अंशिक स्वरुपात दिसून येईल. दरम्यान, भारतात मात्र पेनुम्ब्रल चंद्रग्रहण पाहता येणार आहे.