पाकव्याप्त काश्मीर : पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक झालाच नाही, असा दावा करणाऱ्या पाकिस्तानचे दात स्थानिकांनीच घशात घातले आहेत. कारण पाकव्याप्त काश्मीरमध्ये अतिरेक्यांचे तळ असून, त्यांच्यामुळे हे नंदनवन नरक झाल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.


पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद, कोटली, चिनारी, मिरपूर, गिलगिट, दायमेर, निलम खोऱ्यातील स्थानिकांनी आज दहशतवादी प्रशिक्षण कॅम्पविरोधात निषेध नोंदवला.

दहशवादाचं उच्चाटन करणं गरजेचं आहे. त्यांना घरात लपवून या मुद्द्यावर तोडगा निघणार नाही, अशा घोषणा कोटलीमधील स्थानिकांनी केल्या. तर दहशतवाद्यांचे कॅम्प, बंदी घातलेल्या संघटनांना अन्न धान्य पुरवलं जातं, आम्ही याचा निषेध करतो, असा दावा मुजफ्फराबादमधील स्थानिका नेत्याने केला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून पाकव्याप्त काश्मीरमधल्या सुधारणावादी नेत्यांनी पाकिस्तानविरोधात जाहीर सभा घेऊन, अतिरेक्यांना रसद पुरवं बंद करण्याचा इशारा दिला. त्यामुळे पाकिस्तान लष्कर आणि अतिरेक्यांचं साटंलोटं पुन्हा एकदा उघड झालं आहे.

29 सप्टेंबर रोजी पाक व्यापप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय सैन्याने अतिरेक्यांचे 7 तळ उद्ध्वस्त केले होते. या कारवाईत सुमारे 40 दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता. पण अशी कोणताही कारवाई झाली नसल्याचा कांगावा पाकिस्तानने केला होता.

https://twitter.com/ANI_news/status/783890147133620224