लंडन : लंडनमधल्या पार्सन्स ग्रीन या भुयारी मेट्रो स्टेशनवर ऐन गर्दीच्या वेळी स्फोट झाला. लंडनमधील वेळेनुसार सकाळी 8.15 वाजता हा स्फोट झाला. या स्फोटात अनेक जणांच्या चेहऱ्याला दुखापत झाली असून अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समजते आहे.

स्फोटानंतर पार्सन्स ग्रीन स्टेशनवर लोकांची एकच धावपळ उडाली. या स्फोटानंतर लंडनमधील डिस्ट्रिक्ट लाईनवरील अंडरग्राऊंड मेट्रो सेवा सध्या पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तसेच सर्व सुरक्षा यंत्रणांना पार्सन्स ग्रीन स्टेशनवर तैनात करण्यात आलं आहे.

एबीपी न्यूजच्या लंडन प्रतिनिधी पूनम जोशीच्या माहितीनुसार, हा स्फोट मेट्रो ट्रेनच्या एका डब्ब्यात झाला. दरम्यान, हा स्फोट नेमका कशामुळे झाला याबाबत नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाही.