तब्बल 770 किलोमीटर उंचावरुन गेलेल्या या मिसाईलनं 3700 किलोमीटरपर्यंतचा प्रवास केला. उत्तर कोरियाच्या या आगळीकीमुळे जपानने आपल्या नागरिकांना खबरदारीचा इशारा दिला आहे. तसंच दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींनी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलावली आहे.
महत्वाचं म्हणजे काही दिवसांपूर्वीच संयुक्त राष्ट्रसंघानं उत्तर कोरियावर निर्बंध घातले आहेत. मात्र, तरीही किम जोंग उननं युद्धखोरपणा सोडलेला नाही.
दरम्यान, उत्तर कोरियाने नुकतीच अमेरिकेला गुआम शहरावर क्षेपणास्त्र हल्ले करण्याची धमकी दिली होती. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही उत्तर कोरियाला जशास तसे उत्तर देऊ असे स्पष्ट शब्दात सुनावलं होतं.
दुसरीकडे उत्तर कोरियाच्या युद्धखोर भूमिकेला उत्तर कोरियाचे राजदूत देखील पाठबळ देत आहे. उत्तर कोरियाचे राजदूत हान तेई सॉन्ग यांनी अमेरिकेला भेटवस्तू (क्षेपणास्त्र हल्ल्याच्या माध्यमातून) दिल्या पाहिजेत असं म्हंटलं होतं.
तसेच, अमेरिकेला माझ्या देशाकडून अशा भेट वस्तू तोपर्यंत मिळत राहतील, जोपर्यंत ते आम्हाला चिथावणी देणं, किंवा आमच्यावर दबाव आणण्याचे प्रयत्न बंद करत नाहीत.” असा स्पष्ट शब्दात इशारा दिला होता.
तर उत्तर कोरियाच्या माध्यमांमधूनही किंम जोंग यांच्या युद्धखोर भूमिकेचं समर्थन केलं जात आहे. देशाच्या स्थापना दिनी उत्तर कोरियाने अण्वस्त्रांच्या निर्मितीचं काम हाती घ्यावं, असं आवाहन तिथल्या माध्यमांनी केलं होतं.
संबंधित बातम्या :
उत्तर कोरियाच्या किम जोंगचे 20 क्रूर कारनामे
...त्या माध्यमातून अमेरिकेला भेटवस्तू दिली, उत्तर कोरियाची धमकी
अण्वस्त्र निर्मिती सुरु करा, उत्तर कोरियाच्या मीडियाचं आवाहन
युद्धखोर उत्तर कोरियाच्या नाकेबंदीसाठी संयुक्त राष्ट्रसंघाचे निर्बंध