नैरोबी : केनियात अतिशय दुर्मिळ असे पांढरे जिराफ आढळले आहेत. एक मादी जिराफ आणि तिचं पिल्लू असं आढळलं असून त्यांना अल्बिना जिराफ म्हटलं जातं.
अल्बिना नावानं ओळखले जाणारे हे पांढेर जिराफ सर्वात प्रथम आफ्रिकेत उदयास आले. केनियातील एका कुटुंबाला हे जिराफ आधी जूनमध्ये दिसलं आणि त्यानंतर भूत असल्याची वार्ता देशभर पसरली.
हे जिराफ दुर्मिळ असल्यानं यांना पाहण्यासाठी सध्या जगभरातील पर्यटक गर्दी करत आहेत.
असं म्हटलं जातं की, अनुवंशिक गुणांमुळे म्हणजेच 'ल्यूकिझम'मुळे या जिराफांचा रंग बदलला आहे. यांच्या त्वचेतील पेशींमधून रंग कमी होत जातो. मात्र, ल्यूकिझमचा डोळ्यांवर काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे यांचे डोळे मात्र इतर जिराफ सारखे असतात.
केनियातील पांढरे जिराफ पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Sep 2017 01:11 PM (IST)
अल्बिना नावानं ओळखले जाणारे हे पांढेर जिराफ सर्वात प्रथम आफ्रिकेत उदयास आले. हे जिराफ दुर्मिळ असल्यानं यांना पाहण्यासाठी सध्या जगभरातील पर्यटक गर्दी करत आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -