Laptop Buying Tips : लॅपटॉप खरेदी करणे आपल्याला वाटते तितके सोपे नाही. किंबहुना, जर तुम्ही काही गोष्टींकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला तोटा देखील सहन करावा लागू शकतो. त्यामुळे लॅपटॉप खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत याची माहिती घेऊयात.


लॅपटॉप खरेदी करताना बजेट


लॅपटॉप खरेदी करण्यापूर्वी, लॅपटॉपचे बजेट आधीच ठरवलं पाहिजे. मार्केटमध्ये विविध रेंजमधील लॅपटॉप उपलब्ध आहेत. ज्यामुळे स्वतःसाठी एक चांगला लॅपटॉप निवडणे अधिक कठीण आहे. त्यामुळे लॅपटॉपवर तुम्हाला किती पैसे खर्च करायचे आहेत हे आधी ठरवा.


प्रोसेसर, रॅम आणि बॅटरी


प्रोसेसर आणि रॅम कोणत्याही लॅपटॉपसाठी खूप महत्वाचे असतात. जर तुम्हाला लॅपटॉपवर सामान्य काम करायचे असेल तर intel i3, intel i5 किंवा intel i7 प्रोसेसर ठीक आहे. 4 जीबी रॅम असलेला लॅपटॉप निवडणे हा देखील एक चांगला पर्याय असू शकतो. बहुतेक लॅपटॉपमधील बॅटरी लिथियम आयनची असते. ही बॅटरी जास्त बॅकअप वेळ देते. लॅपटॉप अधिक mAh बॅटरी असलेला लॅपटॉप खरेदी करावा. यामध्ये तुम्हाला दीर्घ बॅटरी बॅकअप मिळेल.


लॅपटॉप स्क्रीन आकार


लॅपटॉप स्क्रीनच्या आकाराकडे लक्ष देण्याचीही गरज आहे. काहींना मोठी स्क्रीन आवडते तर काहींना लहान स्क्रीन आवडते. त्यामुळे तुमच्यानुसार लॅपटॉपची स्क्रीन निवडा. 5 किंवा 15 इंच आकाराचे लॅपटॉप अधिक विकले जातात.


कनेक्टिव्हिटी


सहसा 2 ते 3 यूएसबी टाईप-सी पोर्ट लॅपटॉपमध्ये उपलब्ध असतात. या यूएसबी पोर्टसह लॅपटॉप खरेदी करणे फायदेशीर आहे, कारण ते सार्वत्रिक आहेत. याद्वारे आपण आपला टाइप-सी पोर्ट फोन लॅपटॉपशी सहज कनेक्ट करू शकता.


इतर बातम्या