प्रसिद्ध कंपनी apple ने iphone 13 सीरिज लॉंच केले. iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max या स्मार्टफोनमध्ये कॅमेरा फिचर्स चांगले आहेत. याच फोनच्या कॅमेऱ्या संबंधित अनोखी गोष्ट समोर आली आहे. डोळ्यांच्या (ophthalmologist) एका डॉक्टरने iPhone 13 Pro Max चा वापर करून एका रूग्णाच्या डोळ्याचा उपचार केला आहे. त्यानंतर त्यांचे उपचारा दरम्यानचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले.
उपचारासाठी मिळत आहे मदत
Eye expert डॉक्टर टॉमी कोर्नने एका रूग्णाच्या उपचारा दरम्यान आयफोनचा वापर केला. या स्मार्टफोनमधील मायक्रो मोडटचा वापर करून डॉक्टरांनी रूग्णाच्या डोळ्यांचा फोटो कॅप्चर केला आणि त्या काढलेल्या फोटोच्या मदतीने डोळ्यांची मेडिकल कंडिशन आणि आजार चांगल्या पद्धतीने समजण्यास मदत झाली. त्या कॅमेऱ्याने डॉक्टरांना मदत मिळाली. डॉक्टर टॉमी कोर्न हे शार्प रीस-स्टीली मेडिकल ग्रुपमध्ये (Sharp Rees-Stealy Medical Group) काम करतात.
अल्ट्रा वाइड कॅमेरा सेंसरने होत आहे उपचार
Apple iPhone 13 Pro Max स्मार्टफोनमध्ये मायक्रो फोटोग्राफीसाठी अल्ट्रा-वाइड कॅमेरा सेंसरचा वापर केला आहे. हा कॅमेरा कोणत्याही वस्तूच्या दोन सेंटीमीटरपर्यंत जवळ जाऊन मायक्रो फोटो क्लिक करू शकतो. डॉ. कॉर्नने एका अशा रूग्णावर उपचार केले ज्याचे कॉर्निया ट्रान्सप्लांट झाले होते. डॉक्टरने या पेशंटच्या डोळ्यांचे चेक-अप आयफोन 13 प्रो मॅक्सच्या कॅमेऱ्यानेच केले होते.
Noise New Smartwatch : बजेट सेगमेंटमध्ये Noise चं स्मार्टवॉच लॉन्च; काय आहेत फीचर्स
काळजी चांगली घेतली जाऊ शकते
डॉक्टर टॉमी कोर्नने सांगितले,'या आढवड्यामध्ये iPhone 13 Pro Max चा वापर डोळ्यांच्या मायक्रो फोटोसाठी करत आहे. हे खूप इंट्रेस्टिंग आहे. हे रूग्णाच्या डोळ्यांची योग्य पद्धतीने काळजी घेण्यास मदत करेल.' त्यांनी पुढे सांगितले की, 'पाहूयात आता हा नवा प्रयोग कसा काम करेल.' डॉक्टरने सांगितले की, रूग्ण त्यांच्या डोळ्यांचे फोटो घरीच मोबाईलमध्ये काढू शकतात आणि ते डॉक्टरांना पाठवू शकतात.