Kosovo Serbia Conflict : पूर्व युरोपातील युक्रेन-रशिया यांच्यातील युद्ध (Ukraine Russia War) अद्याप शमलेलं नाही. नवीन वर्षात युद्धाचं सावट दूर होऊन शांतता प्रस्थापित होईल, अशी अपेक्ष व्यक्त होत असतानाच दुसरीकडे रशिया (Russia) युद्ध पुकारण्याची शक्यता आहे. सर्बिया (Serbia) आणि कोसोवो (Kosovo) यांच्यातील अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या संघर्षाचं रुपांतर युद्धात होण्याची चिन्ह आहेत. असं झाल्यास रशिया आणि नाटो देश आमनेसामने येतील. सर्बियाचे संरक्षण मंत्री मिलोस वुसेविक यांनी सोमवारी (26 डिसेंबर) आपल्या सैन्याला युद्धासाठी सज्ज राहण्यास सांगितलं आहे, यावरुनच परिस्थिती किती बिकट आहे, याचा अंदाज येतो.
कोसोवोच्या सीमेवर सर्बियाने आपल्या सैन्याला हाय अलर्टवर ठेवलं आहे. सर्बिया आणि कोसोवो एकमेकांवर सशस्त्र संघर्षाची तयारी करत असल्याचा आरोप करतात तेव्हा दोन्ही देशांमधील संघर्ष वाढतो. सध्या कोसोवोने देखील आपले इरादे दाखवले असून माघार न घेण्याचा निर्णय घेतला आहे. 2008 मध्ये कोसोवो सर्बियापासून स्वतंत्र झाला होता.
कोसोवोने रशियाच्या प्रभावाखाली सर्बियावर असं कृत्य करत असल्याचा आरोप कोसोवोने केला आहे. कोसोवोचे मंत्री जेलल स्वेक्ला यांनी मंगळवारी (27 डिसेंबर) सांगितले की, सर्बिया रशियाच्या प्रभावाखाली कोसोवोला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्ब नागरिकांनी मंगळवारी उत्तर कोसोवोमधील जातीयदृष्ट्या विभाजित असलेल्या मिट्रोविका शहरात नवीन बॅरिकेड्स लावले, त्यामुळे तणाव आणखी वाढला आहे.
वाद का चिघळला?
कोसोवो सर्बियापासून स्वातंत्र्य झाल्यापासून दोन्ही देशांमधला वाद सुरु आहे. 25 डिसेंबर रोजी दोन्ही देशांनी एकमेकांवर गोळीबाराचे आरोप केले होते. हा गोळीबार सर्बियाकडून करण्यात आल्याचा आरोप कोसोवोने केला आहे. त्याचवेळी कोसोवोमध्ये तैनात असलेल्या KFOR (NATO-नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय शांती सैन्य दल) ने हा गोळीबार केल्याचा आरोप सर्बियाने केला आहे. यानंतर गेल्या 10 महिन्यांपासून दोन्ही देशांमधील तणाव आणखीच चिघळला "आम्ही तपास करत आहोत," असं केएफओआरने या गोळीबाराच्या घटनेबाबत सांगितलं. दरम्यान, सर्बियाच्या पंतप्रधान अॅना ब्रनाबिक यांनीही एक निवेदन दिलं आहे. दोन्ही देशांमध्ये युद्ध भडकवण्याचा हा कट असल्याचं त्या म्हणाल्या.
नाटोने काय म्हटलं?
कोसोवो आणि सर्बियामध्ये सुरु असलेल्या तणावादरम्यान, युरोपियन युनियन आणि नाटोने दोन्ही बाजू देशांना संयम बाळगण्याचे आणि शांततेसाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं. कोसोवो आणि सर्बिया सीमेवर 3500 पेक्षा जास्त नाटो सैनिक तैनात आहेत.
तणाव का वाढतो?
कोसोवोच्या उत्तरेला राहणारे सुमारे 50,000 नागरिक हे सर्ब वंशाचे आहेत. ते आपल्या ओळखीसाठी सर्बियन अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या परवाना प्लेट्स आणि कागदपत्रांचा वापर करतात. सोबतच नियम आणि तरतुदी लागू करण्याचा कोसोवोचा अधिकार मान्य करत करत नाहीत. दोन्ही देशांमधील तणावाचं हे मुख्य कारण आहे. तणाव वाढल्यावर दोन्ही देशांमधीस संबंधांवर परिणाम होतो.
हेही वाचा
Russia Ukraine War : युक्रेन-रशिया युद्ध संपण्याचे संकेत, पुतिन चर्चेसाठी तयार; म्हणाले...