Kim Jong Un : किम जोंग उनची सत्ता धोक्यात? हुकूमशाही विरोधात तीन देश एकत्र; नेमकं कारण काय?
North Korea Dictator : किम जोंग उनच्या हुकूमशाही विरोधात तीन मोठे देश एकत्र आले आहेत. अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाविरुद्ध सायबर युद्ध सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
North Korea Dictatorship : उत्तर कोरियात किम जोंग उनच्या सत्तापालटाची तयारी सुरु झाल्याचं बोललं जात आहे. याचं कारण म्हणजे किम जोंग उनच्या हुकूमशाही विरोधात तीन मोठे देश एकत्र आले आहेत. अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाविरुद्ध सायबर युद्ध सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये हुकूमशाह किम जोंग उन यांच्या विरोधात उत्तर कोरियाच्या नागरिकांमध्ये बंडखोरीची निर्माण करण्याचं काम केलं जाणार आहे.
किम जोंग उनची हुकूमशाही संपवण्यासाठी तीन देश एकत्र
उत्तर कोरियातील किम जोंग उन याची हुकूमशाही सत्ता संपवण्यासाठी अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरिया यांनी हातमिळवणी केली आहे. हे तिन्ही देश उत्तर कोरियाविरुद्ध मोठ्या पाताळीवर सायबर युद्ध सुरू करणार आहेत. यामध्ये उत्तर कोरियाच्या हॅकर्सचा मुकाबला करण्यासाठी मोहीमही राबवली जाणार आहे. याशिवाय उत्तर कोरियाच्या हॅकर्सविरोधात बहुराष्ट्रीय सायबर ॲक्शन प्लॅनही लागू केला जाणार आहे.
उत्तर कोरिया जगातील सर्वात मोठं सायबर गुन्ह्याचं केंद्र
पाश्चात्य देशांनी दावा केला आहे की, उत्तर कोरिया जगातील सर्वात मोठं सायबर गुन्ह्याचं केंद्र आहे. उत्तर कोरियाकडे सायबर फसवणूक केंद्र चालवणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या हॅकर्सची एक मोठी टीम असल्याचा दावा करण्यात येत आहे. या सायबर फसवणुकीतून मिळालेला पैसा किम जोंग वापरत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. सायबर फसवणूक हे उत्तर कोरियाच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा मार्ग असल्याचाही दावा करण्यात येत आहे.
किम जोंग उनची हुकूमशाही धोक्यात?
सायबर फ्रॉडद्वारे उत्तर कोरियाचा पैसे कमविण्याचा मार्ग बंद करण्यासाठी आता तीन देश एकत्र येणार आहेत. उत्तर कोरियामध्ये जगातील सर्वात मोठे सायबर फसवणूक केंद्र असल्याचा दावा पाश्चात्य देशांनी केला आहे. यामध्ये हॅकर्सची टीम पैसे चोरण्यासाठी मालवेअरचा वापर करतात. हा पैसा किम जोंग उन आणि त्याच्या कुटुंबासाठी वापरतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :