Kim Jong Un Daughter : उत्तर कोरियाचा (North Korea) हुकूमशाह किम जोंग उन (Kim Jong Un) सुमारे महिनाभर गायब होता. गेला महिनाभर किम जोंग उन नक्की कुठे होता, याबाबत कोणतीही माहिती समोर आली नव्हती. त्यामुळे त्याच्या प्रकृतीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, आता सुमारे महिन्याभरानंतर किम जोंग उन समोर आला आहे. इतकंच नाही तर किम जोंग उनसोबत त्याची नऊ वर्षांच्या मुलीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. किम जोंग उन त्याच्या नऊ वर्षांच्या मुलीला उत्तराधिकारी बनवणार असल्याची चर्चा रंगली आहे.


महिन्याभराने समोर आला हुकूमशाह किंम जोंग उन 


उत्तर कोरियामध्ये सैन्य दलाचा 75 वा स्थापना दिन पार पडला. या निमित्ताने परेडसह मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कार्यक्रमात हुकूमशाह तर दिसलाच पण त्याच्यासोबतच त्याची पत्नी आणि मुलीवरही साऱ्यांच्या नजरा खिळल्या होत्या. विशेष म्हणजे याआधी महिनाभर किम जोंग उन प्रसारमाधमांसमोर दिसला नव्हता. त्यामुळे किम जोंग उन आजारी असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता किम जोंग त्याच्या मुलीसह समोर आला आहे.


नऊ वर्षांची मुलगी बनणार उत्तराधिकारी? 


सैन्य दलाच्या स्थापना दिनानिमित्त परेडचं आयोजन करण्यात आलं होतं. या संपूर्ण कार्यक्रमात किम जोंग शेजारी त्याची लहान मुलगी पाहायला मिळाली. किम जोंगची नऊ वर्षांची मुलगी जु-एई (Kim Ju-ae) यावेळी प्रसार माध्यमांसमोर दिसली. जु-एई माध्यमांसमोर सरकारी कार्यक्रमात दिसण्याची ही पाचवी वेळ आहे. गेल्या काही काळात किम जोंगसोबत जु-एई अनेक वेळ दिसली आहे. जोएई किम जोंगचं दुसरं अपत्य आहे.






किम जोंगची नऊ वर्षांची मुलगी जु-एई


स्थापना दिनानिमित्त सैन्य दलाच्या परेड नंतर किम जोंग भव्य शाहीभोजनाचा आस्वाद घेतला. महत्त्वाचं म्हणजे या भोजनाला किम जोंग सहकुटुंब उपस्थित होता. किमची मुलगी जु-एई सत्ताधारी पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीतही उपस्थित होती. यावेळी सैन्यातील उच्च अधिकाऱ्यांसोबत चर्चा पार पडली. सत्तेच्या कामकाजात किम जोंग उनने जु-एईचा वाढवलेला सहभाग पाहता, किम जोंग नऊ वर्षांच्या मुलीलाच उत्तराधिकारी म्हणून घोषित करु शकतो, असं बोललं जात आहे. 


किम जोंगची मुलगी जु-एई ही याआधी नोव्हेंबर महिन्यामध्ये क्षेपणास्त्र प्रक्षेपणावेळी (Rocket Launch) मीडियाच्या नजरेत आली होती. तेव्हापासूनच जु-एई किम जोंगची उत्तराधिकारी बनणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, जु-एई उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनची संभाव्य उत्तराधिकारी असल्याचं म्हटलं जात आहे. दक्षिण कोरियाच्या KCNA वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, या कार्यक्रमात किम जोंगच्या मुलीची उपस्थिती उत्तर कोरियासाठी फार महत्त्वाची असल्याचं म्हटलं गेलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या


North Korea : 'या' देशात रेड लिपस्टिकवर बंदी, किम जोंग उनचं अजब फर्मान; कारण आहे विचित्र