Donald Trump on kamala Harris : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपराष्ट्रपती कमला हॅरिस (Donald Trump on kamala Harris) यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, पोस्टमध्ये म्हटले आहे की हॅरिस यांनी राजकारणातील कारकीर्द पुढे नेण्यासाठी शारीरिक संबंधांचा वापर केला आहे. 1990 च्या दशकात, कमला हॅरिस 30 वर्षांनी ज्येष्ठ असलेल्या सॅन फ्रान्सिस्कोचे माजी महापौर विली ब्राउन यांच्याशी नातेसंबंधात होत्या. ते कॅलिफोर्निया राज्य विधानसभेचे अध्यक्षही होते. विली ब्राउन यांच्यासोबतच्या संबंधांमुळे हॅरिस यांना राजकारणात पुढे जाण्यास मदत झाल्याचा आरोप ट्रम्प यांनी पोस्टद्वारे केला आहे.


हिलरी क्लिंटन यांच्यावरही आक्षेपार्ह टिप्पणी


ट्रम्प यांनी त्यांच्या एका समर्थकाची पोस्ट पुन्हा शेअर केली. त्यात हॅरिस आणि हिलरी क्लिंटन एकत्र दिसत असलेल्या फोटोचाही समावेश आहे. याद्वारे ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांच्यावरही भाष्य केले. हिलरी यांचे पती आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यावर 1995 मध्ये व्हाईट हाऊसमधील इंटर्न मोनिका लेविन्स्कीसोबत शारीरिक संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता.


दहा दिवसात दुसऱ्यांदा आक्षेपार्ह टिप्पणी 


दोघांचे नाते 18 महिने टिकले. 26 जानेवारी 1998 रोजी एका दूरचित्रवाणी संबोधनात क्लिंटन म्हणाल्या की, त्यांचे लेविन्स्कीसोबत कोणतेही अफेअर नाही. या वादामुळे क्लिंटन यांच्याविरोधात हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये महाभियोग प्रस्तावही आणण्यात आला होता. 2000 च्या अध्यक्षीय निवडणुकीत या वादाचा फटका डेमोक्रॅटिक पक्षाला सहन करावा लागला होता. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, गेल्या 10 दिवसांत ट्रम्प यांनी कमला हॅरिसवर आक्षेपार्ह टिप्पणी करण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी 18 ऑगस्ट रोजी ट्रम्प यांनी हॅरिस आणि विली ब्राउन यांच्या नात्याबाबत एक पोस्ट केली होती.


मला हॅरिस भारतीय आहेत की कृष्णवर्णीय?


यापूर्वी ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांच्या वांशिक अस्मितेवरही प्रश्न उपस्थित केले होते. ट्रम्प यांनी एका मुलाखतीत विचारले होते की कमला हॅरिस भारतीय आहेत की कृष्णवर्णीय? अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष म्हणाले होते की, कमला हॅरिस नेहमीच स्वत:ला भारतीय वारसा म्हणून सांगतात, पण काही वर्षांपूर्वी अचानक त्या काळ्या झाल्या. कमला कृष्णवर्णीय आहे हे मला अनेक वर्षांपासून माहीत नव्हते, त्या भारतीय वंशाच्या आहेत, असे त्यांना वाटत राहिल्याचे ट्रम्प म्हणाले. आता काही वर्षांपासून कमला स्वतःला कृष्णवर्णीय म्हणू लागल्या आहेत. कमला यांना कृष्णवर्णीय महिला म्हणून जगात ओळखायचे आहे, असे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते.


इतर महत्वाच्या बातम्या