You tuber Miles Routledge on India : ब्रिटीश इनफ्लुएन्सर असलेल्या माइल्स रौटलेजने (You tuber Miles Routledge on India) सोशल मीडिया पोस्टमध्ये भारतावर अण्वस्त्र हल्ला करण्याची धमकी दिली. माइल्सने बुधवारी (21 ऑगस्ट) X वर ही पोस्ट केली. माईल्सने ही पोस्ट करून नंतर डिलीट केली. 


माईल्सने पोस्टमध्ये लिहिले की, छोट्याशा चुकीसाठीही मी भारतासह (You tuber Miles Routledge on India) अनेक देशांवर अणुहल्ला करणार आहे, पण नंतर माईल्सने ती पोस्ट डिलीट केली. त्याच्या पोस्टनंतर इंटरनेटवर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली, अनेकांनी माइल्सच्या पोस्टला विरोध करत कमेंट केल्या. अशाच एका कमेंटला उत्तर देताना माइल्सने लिहिले की, मला भारत आवडत नाही. याशिवाय त्याने वांशिक टिप्पणीही केली होती.






मी इंग्लंडचा पंतप्रधान झालो तर अण्वस्त्र हल्ले करेन


दुसऱ्या पोस्टमध्ये माइल्सने लिहिले की, मी इंग्लंडचा पंतप्रधान झाल्यावर ब्रिटीशांच्या कारभारात हस्तक्षेप करणाऱ्या कोणत्याही देशाला इशारा देण्यासाठी अण्वस्त्र हल्ला करीन. मी मोठ्या घटनांबद्दल बोलत नाही, छोट्याशा चुकीवरही मी संपूर्ण देशाचा नाश करीन.


तालिबानच्या ताब्यादरम्यान माइल्स अफगाणिस्तानात अडकला


2021 मध्ये तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला तेव्हा माइल्स रौटलेज तिथे अडकला होता. ब्रिटिश सरकारच्या इशाऱ्यांना न जुमानता तालिबानचा हल्ला पाहण्यासाठी तो अफगाणिस्तानात गेला. यानंतर माईल्स तिथेच अडकला. त्याने एका घरात आसरा घेतला. तेथून ब्रिटीश आर्मीने त्याला बुरखा घातलेल्या महिलेच्या वेशात बाहेर काढले. या घटनेनंतर माईल्स डेंजरस टुरिस्ट म्हणून प्रसिद्ध झाला. माइल्सने डिसेंबर 2022 मध्ये 'द फॉल ऑफ अफगाणिस्तान' नावाचे अँटिलोप हिलसह एक पुस्तकही लिहिले आहे.


माइल्सने कझाकस्तान, युगांडा, केनिया, दक्षिण सुदान, युक्रेन आणि ब्राझीलसह अनेक ठिकाणी प्रवास केला आहे. चुकीच्या पद्धतीने सीमा ओलांडल्याबद्दल आणि इतर अनेक कारणांमुळे त्याला अनेकवेळा तुरुंगात जावे लागले.


इतर महत्वाच्या बातम्या