Kabul Twin Blasts: अफगाणिस्तानची राजधानी काबुमधील लष्करी रुग्णालयाजवळ दोन भीषण स्फोट (Military Hospital) झाल्याची घटना उघडकीस आलीय. या स्फोटमध्ये 19 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय. तर, 50 जण जखमी झालेत. पहिला स्फोट सरदार मोहम्मद दाऊद खान रुग्णालयासमोर झाला. दुसरा स्फोटही याच रुग्णालयाजवळच्या परिसरात झालाय. स्फोट क्षेत्रातून गोळीबाराचा आवाजही ऐकू आल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितलंय. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली असून मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.


इस्लामिक अमिरातीचे उप प्रवक्ते बिलाल करीमी यांनी सांगितलंय की,  काबूल शहरातील पोलीस जिल्हा 10 मधील लष्करी रुग्णालयाच्या गेटवर दोन ब्लास्ट झाले. त्यानंतर घटनास्थळी सुरक्षा दल पाठवण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलंय. या स्फोटांची जबाबदारी आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही. मीडिया रिपोर्ट्समध्ये असं सांगितलं जातंय की, आयएसआयएलशी जुडीत अनेक सशस्त्र लोक रुग्णालयात घुसत असताना त्यांची रुग्णालयातील सुरक्षा कर्मचार्‍यांशी चकमक झाली. या स्फोटानंतर नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.  राजधानीत झालेल्या स्फोटाबाबत तालिबानकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.


अफगाणिस्तानमध्ये काही दिवसांपूर्वीच कुंदुझमध्ये शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी मोठा स्फोट झाला होता. या स्फोटात 100 जणांनी आपले प्राण गमावले होते. तर, अनेकजण गंभीर जखमी झाले होते. हजारा शिया मशिदीला लक्ष्य करून हा स्फोट करण्यात आला होता. "हा आत्मघाती हल्ला होता. अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार स्थापन झाल्यानंतरचा हा देशातील सर्वात मोठा हल्ला होता", कुंदुझमधील संस्कृती आणि माहितीचे संचालक मतिउल्ला रुहानी यांनी सांगितले होते.


संबंधित बातम्या-