Bill gates  birthday celebration : जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जाणाऱ्या बिल गेट्स यांचा नुकताच वाढदिवस साजरा करण्यात आला. बिल गेट्स यांनी अब्जाधीश असलेल्या जेफ बेझोस यांना त्यांच्या प्राइव्हेट बर्थडे पार्टीला आमंत्रित केले होते. एका रिपोर्टनुसार,  ही बर्थडे पार्टी  बोडरम जवळील तुर्की खाडी येथे आयोजित करण्यात आली होती. 


मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांचा 66 वा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. जेफ बोझोस यांच्या सह 50 पाहुण्यांना या पार्टीमध्ये आमंत्रित करण्यात आले होते. तुर्की वृत्तपत्र डेली सबा यांच्या वृत्तानुसार,  फेथिये येथील सी मी बीचवर ही पार्टी आयोजित करण्यात आली होती.  बिल गेट्स यांच्या मेगायाटमधून लाना येथून पार्टीला आलेल्या पाहुणांना  हेलिकॉप्टरने निर्जन आणि नयनरम्य खाडीपर्यंत नेण्यात आले. रिपोर्टनुसार, ज्या नौकेवर पार्टी  आयोजित करण्यात आली होती, त्या नौकेसाठी बिल गेट्स हे दर आठवड्याला 1.8 दशलक्ष युरो भाडे देत होते.   


25 वर्षाच्या तरुणाला बेलफोर्टचा अजब सल्ला, म्हणाला 60 हजार डॉलर्सची नोकरी सोड! व्हिडीओ तुफान व्हायरल


तुर्की वृत्तपत्र येनी सफाक यांच्या रिपोर्टनुसार,  बिल गेट्स बर्थडे पार्टी ज्या नौकेमध्ये आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये जिम, जकूझी, बीच क्लब आणि स्विमिंग पूल इत्यादी सुविधा आहेत. रिपोर्टनुसार  बिल गेट्स तुर्कीच्या किनारपट्टीवर वेळ घालवत  होते आणि गेल्या आठवड्यात त्यांनी लोकप्रिय पर्यटन स्थळ बोडरमला भेट दिली. डेली सबा यांच्या रिपोर्टनुसार, बिल गेट्स यांच्या वाढदिवसाची पार्टी सुमारे चार तास सुरू होती. बर्थ- डे पार्टीच्या मेन्यूमध्ये सीफूड, सुशी आणि पिझ्झाचा समावेश होता. प्राइव्हसीसाठी पार्टीसाठी उपस्थित असणाऱ्यांना फोनचा वापर करण्यास बंदी होती. 


Bill Gates : गतकाळात बिल गेट्स यांनीही आयुष्याचा मनमुराद 'आनंद' लुटला आहे; पत्रकाराचा गौप्यस्फोट


वैवाहिक नात्यातून विभक्त होताना बिल गेट्स- मेलिंडा यांचा मोठा निर्णय


काय सांगताय? 24 वर्षाच्या महिलेने दिला एकाच वर्षात 21 मुलांना जन्म, शंभरचा आकडा गाठण्याचा निर्धार