एक्स्प्लोर

डोनाल्ड ट्रम्प यांची कारकीर्द

मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतल लोकप्रिय पण तितकंच वादग्रस्त व्यक्तिमत्व. एक उद्योगपती ते राजकारणी असा ट्रम्प यांचा प्रवास आहे. डोनाल्ड ट्रम्प. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतलं आजवरचं कदाचित सर्वात वादग्रस्त व्यक्तीमत्त्व. बेछूट वक्तव्यं आणि महिलांविषयी अश्लील टिप्पणीमुळं ट्रम्प यांची प्रतिमा आज काळवंडली आहे. पण एका जमान्यात ट्रम्प एक उद्योगपती म्हणून प्रसिद्ध होते. रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळवण्याआधी ट्रम्प रिअल इस्टेटच्या दुनियेतलं सर्वात मोठं नाव मानले जायचे. न्यूयॉर्कच्या क्षितिजावर दिसणाऱ्या गगनचुंबी इमारतींपैक ट्रम्प टॉवर, ट्रम्प प्लेस, ट्रम्प पार्क, ट्रम्प प्लाझा... अशा इमारती डोनाल्ड यांनी उभारल्यात. स्वतः ट्रम्प फ्लोरिडात पाम बीच इथं अलिशान ट्रम्प पॅलेसमध्ये राहतात. ट्रम्प यांच्या व्यावसायिक यशाचंच या इमारती प्रतीक आहेत. ट्रम्प यांचे वडील फ्रेडरिक ट्रम्पही बांधकाम व्यवसायात होते. ट्रम्प यांनी तो वारसा पुढं नेलाय. गेल्या 40 वर्षांत ट्रम्प यांच्या उद्योग साम्राज्याचा पसारा एवढा वाढला, की ते जवळपास 100 कंपन्यांचे मालक बनले. 1946 साली न्यूयॉर्कमध्ये ट्रम्प यांचा जन्म झाला. त्यांनी विज्ञानशाखेतून शिक्षण घेतलं. कॉलेजच्या दिवसांत एक विद्यार्थी नेता म्हणून आपली ओळख बनवली. खेळाकडेही त्यांचा ओढा होता. पैजा लावणं आणि त्या जिंकणं हा ट्रम्प यांचा छंदच आहे. एक कुशल वक्ता अशी ट्रम्प यांची ओळख आहे. भाषणं ठोकण्याची आणि गर्दी जमवण्याची कला त्यांना अवगत आहे. अर्थात निवडणुकीआधी हिलरी यांच्यासोबत झालेल्या वादचर्चेत ते काहीसे मागे पडल्यासारखेही वाटले. टीकाकारांच्या मते ट्रम्प केवळ मेक अमेरिका ग्रेट अगेन अशी घोषणाबाजी करतात, मी सगळं सुधारेन असं म्हणतात, पण त्यांच्याकडे तशी कोणतीही ठोस योजना दिसत नाही. अनेकदा बोलण्याच्या ओघात ते वादग्रस्त विधानं करतात. अमेरिकेतील मुस्लिम समुदाय असो, मेक्सिकन वंशाचे नागरिक असोत किंवा स्त्रिया. या सर्वांविषयी भडकावू विधानांमुळंच ट्रम्प अलीकडे जास्त चर्चेत राहिले आहेत. अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये मोठी भिंत बांधण्याचा त्यांचा मानस आहे, जेणेकरून मेक्सिकन आणि सीरीयन शरणार्थी अमेरिकेत येणार नाहीत. पण अशा कट्टर विचारसरणीमुळं एका मोठ्या वर्गात त्यांची लोकप्रियताही वाढली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
युक्रेनमध्ये मालवाहू जहाजावर रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ला, चार भारतीयांसह एकूण 10 जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर  
युक्रेनमध्ये मालवाहू जहाजावर रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ला, चार भारतीयांसह एकूण 10 जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर  
Donald Trump: 'इराणसाठी नरकाचे दरवाजे उघडा' जॉर्डनमधील दोन सैनिकांच्या मृत्यूनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची संतप्त प्रतिक्रिया; इराणवर पुन्हा मोठा हवाई हल्ला
'इराणसाठी नरकाचे दरवाजे उघडा' जॉर्डनमधील दोन सैनिकांच्या मृत्यूनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची संतप्त प्रतिक्रिया; इराणवर पुन्हा मोठा हवाई हल्ला
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
High Court: मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
E20 Janta Party: E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
Nashik Crime: 13 वर्षीय चिमुकलीवर वारंवार अत्याचार, मानसिक अन् शारीरिक छळाला कंटाळून पीडितेनं जीवन संपवलं; शवविच्छेदनानंतर भयावह सत्य समोर आलं, नराधमास जन्मठेप
13 वर्षीय चिमुकलीवर वारंवार अत्याचार, मानसिक अन् शारीरिक छळाला कंटाळून पीडितेनं जीवन संपवलं; शवविच्छेदनानंतर भयावह सत्य समोर आलं, नराधमास जन्मठेप
Kushal Badrike In Maharashtrachi Hasiyajatra Watch Promo: 'चला हवा येऊ द्या' नंतर कुशल बद्रिके आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवणार; प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
'चला हवा येऊ द्या' नंतर कुशल बद्रिके आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवणार; प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
Maharashtra Rain Update: राज्यात आज कुठे यलो, कुठे ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं असेल? जाणून घ्या सविस्तर
राज्यात आज कुठे यलो, कुठे ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं असेल? जाणून घ्या सविस्तर
सेटवरच्या 'टी बॉय'पासून बॉलिवूडच्या दिग्गज दिग्दर्शकापर्यंतचा प्रवास; कित्येक नव्या कलाकारांवर दाखवला विश्वास अन् घडवले कित्येक सुपरस्टार, ओळखलं का कोण?
सेटवरच्या 'टी बॉय'पासून बॉलिवूडच्या दिग्गज दिग्दर्शकापर्यंतचा प्रवास; कित्येक नव्या कलाकारांवर दाखवला विश्वास अन् घडवले कित्येक सुपरस्टार, ओळखलं का कोण?
MPSC Paper Leak: नीटनंतर आता MPSC औषध निरीक्षक भरतीही वादात; पेपरफुटीचे गंभीर आरोप, पुराव्यांसह तक्रार, नेमकं प्रकरण काय?
नीटनंतर आता MPSC औषध निरीक्षक भरतीही वादात; पेपरफुटीचे गंभीर आरोप, पुराव्यांसह तक्रार, नेमकं प्रकरण काय?
Embed widget