वॉशिंग्टन: अमेरिकेचे विमान UA328 हवेत गेल्यानंतर काहीच वेळात इंजिन फेल झाल्याचं लक्षात आलं. या इंजिनला आग लागल्याने लगेच विमानाचे लॅन्डिंग करावं लागलं. अमेरिकन एयरलाइन्स फ्लाइट 328 हे विमान डेन्व्हर ते होनोलूलू असा प्रवास करत होतं. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. आता या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.





फ्लाइट UA328 हे इंजिनच्या फेल्यूअरमुळे डेनव्हरला लॅन्ड करावं लागलं. हवेत असताना वा जमीनीवर उतरताना कोणतीही जीवितहानी झाली नाही असं अमेरिकन एयरलाईन्सने स्पष्ट केलंय. सदरची घटना 20 फेब्रुवारीला घडली आहे.





International Mother Language Day: या देशाचा मातृभाषेसाठी लढा....म्हणून साजरा केला जातोय जागतिक मातृभाषा दिवस


फ्लाइट UA328 हे विमान डेन्व्हर ते होनोलूलू या दरम्यान प्रवास करत होतं. डेन्व्हरवरुन उड्डान घेतल्यानंतर काहीच वेळात या विमानाच्या इंजिनमध्ये काही बिघाड झाल्याचं लक्षात आलं. एका व्हिडीओमध्ये या विमानाच्या इंजिनला आग लागल्याचं स्पष्ट दिसतंय. त्यामुळे हे विमान पुन्हा डेन्व्हरला मागे फिरवण्यात आलं आणि त्याचं सुरक्षितपणे लॅन्डिंग करण्यात आलं. आता या घटनेची चौकशी करण्यात येणार आहे.


World Day of Social Justice: का साजरा केला जातो जागतिक सामाजिक न्याय दिन? भारतीय राज्यघटनेत त्याचं काय महत्व आहे?