Tiger Woods Accident : जगप्रसिद्ध गोल्फ प्लेयर टायगर वुड्स कार अपघातात थोडक्यात बचावला आहे. लॉस एंजेलिस येथे टायगर वुड्सच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात टायगर वुड्सला गंभीर इजा झाली आहे. लॉस एंजेलिसच्या काऊंटी शेरिफ विभागाने मंगळवारी याबाबत माहिती दिली. अपघातानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
लॉस एंजेलिस काऊंटी शेरीफ विभागाच्या माहितीनुसार, वूड्स स्थानिक वेळेनुसार सकाळी 7.12 वाजता हॉथोर्न बुलेव्हार्डवर जात असताना त्यांची कार ब्लॅकहॉरस रोडवर आदळली. लॉस एंजेलिस काउंटीमधील रँचो पालोस वेरिड्स आणि रोल्स हिल्स इस्टेट यांना वेगळे करणाऱ्या सीमेवर होते. पोलिसांनी सांगितले की, टायगर वुड्स कारमध्ये एकटे प्रवास करत होते. अपघातात त्यांच्या कारचं बरंच नुकसान झालं आहे. हा अपघात नेमका कसा झाला याची अद्याप चौकशी सुरू आहे.
टायगर वुड्सने काही महिन्यांपूर्वी पीजीए टूर इवेंट, जेनेसिर ओपन एट रिवेरा कंट्ररी क्लब एट पॅसिफिक पालिसॅड्स, कॅलिफोर्निया येथे सहभाग नोंदवला होता. मात्र त्यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली होती. या शस्त्रक्रियेमुळे काही स्पर्धांमध्ये खेळला नव्हता. गोल्फ डायजेस्टच्या म्हणण्यानुसार, वुड्स गोल्फ टीव्ही शूट दरम्यान अनेक सेलिब्रिटींना गोल्फबद्दल माहिती सांगणार होता.
जेनेसिस टेलिव्हिजनच्या प्रसारणादरम्यान रविवारी सीबीएसच्या जिम नँटसने टायगर वुड्सची संवाद साधला होता. या दरम्यान त्याने सांगितले की यावर्षीच्या मास्टर्समध्ये सुमारे सात आठवडे खेळणे अपेक्षित आहे. वुड्सने चौथी मायक्रोडिसिसटॉमी प्रक्रिया आणि 23 डिसेंबरला पाचव्यांदा पाठची शस्त्रक्रिया केली.