टोकियो: जपानमध्ये ट्विटर किलिंगच्या खळबळ उडवून देणाऱ्या प्रकरणाचा निकाल लागला आहे. टोकियो जिल्हा न्यायालयाने मंगळवारी 'ट्विटर किलर' ला मृत्यूदंडाची शिक्षा दिली आहे. हा किलर आत्महत्या करण्याचा विचार असल्याच्या पोस्ट टाकणाऱ्या तरुणांशी संपर्क साधायचा आणि त्यांचा खून करायचा. ताकाहिरो शिराईसी असं या ट्विटर किलरचं नाव असून तो 30 वर्षाचा आहे. हे सारे खून आरोपीने स्वत:च्या मर्जीनं केले आहेत का मृत व्यक्तींनी तशी मागणी केली होती या गोष्टीवर न्यायालयात सुनावणी सुरु होती.


टोकियोच्या जिल्हा न्यायालयाने त्याला खून करणे, मृतदेहाचे तुकडे करुन फ्रिजमध्ये ठेवणे या गुन्ह्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ट्विटर किलरने त्याच्यावर लावण्यात आलेले सर्व गुन्हे मान्य केले आहेत. ताकाहिरो शिराईसीच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं होतं की, "आपल्या अशिलाने मृत लोकांच्या संमतीने त्यांचा खून केला आहे. त्यामुळे या कायद्यांतर्गत त्याच्यावर खटला चालवण्यात यावा." न्यायालयाने त्यांची ही मागणी धुडकावली होती.


सरकारच्या वतीनं केस लढणाऱ्या वकिलांनी आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली होती. संबंधित आरोपीने त्याच्यावर ठेवण्यात आलेले सर्व आरोप मान्य केल्याने न्यायालयाने त्याला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे.


काय आहे प्रकरण?
आपण आत्महत्या करणार असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकाणाऱ्या 15 ते 26 वयाच्या तरुणांच्या शोधात ताकाहिरो शिराईसी असायचा. त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर आपल्याही मनात आत्महत्येचे विचार येत असून मी आपल्याला आत्महत्या करायला मदत करतो असं सांगायचा. जपानी भाषेत हॅंगमॅन असे नाव असलेल्या आपल्या ट्विटर अकाउंटच्या माध्यमातून संबंधित तरुणांना तो आपल्या घरी बोलवायचा आणि त्यांचा खून करायचा. नंतर त्या मृतदेहाचे तुकडे करुन ते फ्रिजमध्ये टाकायचा. ही सर्व प्रकरणे 2107 सालची आहेत. अशा प्रकारचे नऊ खून केल्याचं आरोपीनं न्यायालयात कबुल केलं आहे.


प्रकरण कसं उघडकीस आलं?
टोकियो मध्ये एक 23 वर्षीय महिला गायब झाल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्या महिलेच्या शोधात ऑक्टोबर 2017 मध्ये पोलीस ताकाहिरो शिराईसी याच्या घरी पोहचले. तिथं त्यांना अनेक फ्रिजमध्ये मृतदेह ठेवल्याचं आढळलं. अधिक तपास केल्यानंतर ताकाहिरो शिराईसीने अशा प्रकारचे नऊ खून केल्याचं उघड झालं. या खून प्रकरणामुळे जपानमध्ये खळबळ उडाली होती.


या प्रकरणानंतर जपान सरकारने आणि सोशल नेटवर्किंग साइट्सनी आत्महत्येचा विचार मनात येणाऱ्या अशा प्रकारच्या तरुणांच्या मदतीसाठी प्रयत्न सुरु केले.


महत्वाच्या बातम्या: