एक्स्प्लोर

आई-वडिलांनी जंगलात सोडलेला चिमुकला सात दिवसांनी सापडला

टोकियो (जपान) : जपानमधील जंगलात हरवलेला सात वर्षांचा छोटा मुलगा अखेर सापडला आहे. तो सुखरुप आहे. जपानच्या होक्काईडो बेटांवरील जंगलात त्याच्या वडिलांनीच रागाच्या भरात त्याला शिक्षा म्हणून सोडून दिलं होतं. आपली चूक लक्षात आल्यावर त्याचा शोध सुरु करण्यात आला. जपान सरकारने त्याला शोधण्यासाठी विशेष अभियान राबवलं. तब्बल आठवडाभराच्या शोध मोहीमेनंतर तो जपानी मुलगा सापडला आहे.     या मुलाचं नाव यामाटो तंदूका असं आहे. त्याच्या वडिलांनी त्याला जिथे सोडलं होतं, तिथून तब्बल चार किलोमीटर अंतरावर जंगलात असलेल्या सैन्य प्रशिक्षणाच्या छोट्या इमारतीजवळ सापडला. त्याच्या वडिलांनी त्याला खोड्या केल्या, म्हणून 28 मे रोजी जंगलात सोडून दिलं होतं.
काय घडलं सात दिवसांपूर्वी?   जपानमधील एक जोडपं आपल्या मुलगा आणि मुलीसोबत हायकिंग शनिवारी करण्यासाठी होक्काईदो बेटावरील एका पार्कमध्ये गेलं होतं. या पार्कजवळील पर्वताळ भागात जंगली अस्वलांचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे. मात्र मुलगा यामातो गाड्या आणि लोकांना दगड मारत असल्यामुळे वैतागलेले पालक त्याला ओरडले. पालकांचा ओरडा खाऊनही वठणीवर न आलेल्या यामातोला मोठी शिक्षा द्यायचं पालकांनी ठरवलं. परत येताना त्यांनी पोटच्या पोराला गाडीतून खाली उतरवलं आणि गाडी पुढे नेली. सुमारे 500 मीटर अंतरावर गेल्यानंतर त्यांनी गाडी पुन्हा मागे वळवली.     काही क्षणांपूर्वी मुलाला ज्या ठिकाणी सोडलं होतं, तिथे तो न सापडल्याने मात्र पालकांचे धाबे दणाणले. पालकांनी पोलिसात धाव घेत आपला लेक हरवल्याची तक्रार नोंदवली. आधी आपण भाज्या तोडत असताना मुलगा नजर चुकवून पळाल्याचं सांगणाऱ्या जोडप्याने नंतर मात्र कबुली दिली.  

शिक्षेपोटी 7 वर्षांच्या चिमुरड्याला जंगलात सोडून पालकांचा पळ

  यामाटोचे वडील टाकायुकी तंदूका यांनी मुलाला शिक्षा म्हणून जंगलात सोडून देण्याच्या कृतीबद्धल आपल्या मुलाची जाहीर माफीही मागितली आहे. त्याला शिक्षा म्हणून केलेली कृती एवढी भीषण होईल, असा विचारही केला नव्हता, असं त्यांनी स्थानिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.     पोलिसांसह 180 जणांचं पथक, कुत्रे आणि घोड्यांसह मुलाचा शोध घेत होतं. जंगलात यामाटोचा शोध घेणाऱ्या सेल्फ डिफेन्स फोर्सच्या जवानांना तो सैन्य प्रशिक्षणासाठी बनवलेल्या एका इमारतीजवळ सापडला. त्यावेळी त्याला खूप भूक लागली होती. त्याचा शोध घेणाऱ्या जवानांनी त्याला सर्वात आधी पाणी नंतर खायला दिलं. यामाटोने नंतर पोलिसांना सांगितलं की, तो हरवला त्या रात्रीच इमारतीच्या जवळ पोहोचला होता.     तो अन्न-पाण्याशिवाय तब्बल सात दिवस जिवंत राहू शकला याविषयी आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
युक्रेनमध्ये मालवाहू जहाजावर रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ला, चार भारतीयांसह एकूण 10 जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर  
युक्रेनमध्ये मालवाहू जहाजावर रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ला, चार भारतीयांसह एकूण 10 जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर  
Donald Trump: 'इराणसाठी नरकाचे दरवाजे उघडा' जॉर्डनमधील दोन सैनिकांच्या मृत्यूनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची संतप्त प्रतिक्रिया; इराणवर पुन्हा मोठा हवाई हल्ला
'इराणसाठी नरकाचे दरवाजे उघडा' जॉर्डनमधील दोन सैनिकांच्या मृत्यूनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची संतप्त प्रतिक्रिया; इराणवर पुन्हा मोठा हवाई हल्ला
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
High Court: मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
E20 Janta Party: E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
Kanpur News : ओळखलंत का मला? मी तुमची पहिली पत्नी.., दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाच्या लग्नात पहिल्या पत्नीची एन्ट्री; नववधूसह वऱ्हाडी थक्क, नवरदेवानं धूम ठोकली
ओळखलंत का मला? मी तुमची पहिली पत्नी.., दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाच्या लग्नात पहिल्या पत्नीची एन्ट्री; नववधूसह वऱ्हाडी थक्क, नवरदेवानं धूम ठोकली
Nashik Crime: 13 वर्षीय चिमुकलीवर वारंवार अत्याचार, मानसिक अन् शारीरिक छळाला कंटाळून पीडितेनं जीवन संपवलं; शवविच्छेदनानंतर भयावह सत्य समोर आलं, नराधमास जन्मठेप
13 वर्षीय चिमुकलीवर वारंवार अत्याचार, मानसिक अन् शारीरिक छळाला कंटाळून पीडितेनं जीवन संपवलं; शवविच्छेदनानंतर भयावह सत्य समोर आलं, नराधमास जन्मठेप
Kushal Badrike In Maharashtrachi Hasiyajatra Watch Promo: 'चला हवा येऊ द्या' नंतर कुशल बद्रिके आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवणार; प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
'चला हवा येऊ द्या' नंतर कुशल बद्रिके आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवणार; प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
Devendra Fadnavis and Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस कितीही नाही म्हणाले तरी मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
देवेंद्र फडणवीस 100 टक्के दिल्लीत जाणार, मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
Maharashtra Rain Update: राज्यात आज कुठे यलो, कुठे ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं असेल? जाणून घ्या सविस्तर
राज्यात आज कुठे यलो, कुठे ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं असेल? जाणून घ्या सविस्तर
Embed widget