नवी दिल्ली : चंद्रावर जाण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. प्रेमाच्या आणाभाका घेतानाही चंद्राचा उल्लेख आवर्जुन केला जातो. अनेकदा तर प्रेयसिला तुझ्यासाठी चंद्र-तारे घेऊन येईन असं आश्वासनही दिलं जातं. पण आता हे स्वप्न साक्षात होऊ शकतं. जपानमधील एका अब्जाधीशाने चंद्रावर जाण्याची ऑफरच दिली आहे. जपानमधील अब्जाधीश युसाकु मेजवा लवकरच चंद्रवारी करणार आहे. तसेच तो आपल्यासोबतच इतरही काही जणांचं स्वप्न साकार करणार आहे.
जपानमधील अब्जाधीश युसाकु मेजवा चंद्रवारी करणार असून तो आपल्यासोबत आठ लोकांना चंद्रावर फिरण्यासाठी घेऊन जाणार आहे. त्यासाठी त्याने निमंत्रण दिलं आहे. स्पेसएक्सचे संस्थापक एलन मस्कच्या स्पेसएक्स रॉकेटमधून युसाकु मेजवा चंद्रावर जाणार आहे. यासंदर्भातील खुलासा स्वतः युसाकुने एक व्हिडीओ शेअर करत केला आहे.
आपल्या व्हिडीओमध्ये युसाकुने आपल्यासोबत आठ लोकांना चंद्रावर घेऊन जाणार असल्याचं सांगितलं आहे. त्यासाठी युसाकुने एक फॉर्मही जारी केला आहे. आपल्या व्हिडीओमध्ये युसाकुने यासंदर्भात माहिती देताना सांगितलं की, त्याने या चंद्रवारीची सर्व तिकिटं खरेदी केली आहेत. त्यामुळे ही चंद्रवारी एकप्रकारे खाजगी असणार आहे.
पाहा व्हिडीओ :
युसाकुसोबत प्रवास करणाऱ्या 8 जणांचा खर्च कोण करणार?
आपल्या व्हिडीओच्या माध्यामातून युसाकुने म्हटलं आहे की, तो त्याच्यासोबत चंद्रावर फिरण्यासाठी येणाऱ्या इतर आठ जणांचाही खर्च उचलणार आहे. त्यामुळे युसाकुसोबत चंद्रावर फिरण्यासाठी जाणाऱ्या 8 जणांना यासाठी एकही पैसा मोजण्याची गरज नाही. त्यांना अगदी मोफत चंद्रावर सैर करण्याची संधी मिळणार आहे. युसाकु 2023मध्ये स्पेसएक्स रॉकेटमधून चंद्रवारीसाठी जाणार आहे. या मिशनला 'डियर मून' असं नाव देण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :