सागमिहारा (जपान): जपानमधील सागमिहारा शहरातील अपंग साहाय्य केंद्रात तरुणानं केलेल्या चाकू हल्ल्यात 15 लोकांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.


 

अपंग साहाय्य केंद्रावर हल्लेखोराने केलेल्या हल्ल्यात 15 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 45 जण जखमी झाले आहेत. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या हल्ल्यात काही जण गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं आहे.   स्थानिक वेळेनुसार पहाटे अडीचच्या सुमारास हल्लेखोराने अपंग केंद्रावर हल्ला केला.

 



 

हल्लेखोर हा 20 वर्षीय असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हल्लेखोर हा याच अपंग साहाय्य केंद्रात आधी काम करत होता. अपंगांना या पृथ्वीतलावरून नेस्तनाबूत करण्याच्या इराद्याने आपण हल्ला केल्याची कबुली या हल्लेखोराने दिली आहे.

 

दरम्यान, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत असून हल्ल्यानंतर अंपग साहाय्य केंद्राभोवती पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.