Israeli airstrikes on Gaza Strip : इस्त्राइल (Israel) आणि गाझा (Gaza) यांच्यातील संघर्ष कायम आहे. इस्त्राइलने पुन्हा एकदा गाझा पट्टीवर (Gaza Strip) हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात 24 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश असल्याची माहिती आहे. पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे की, पॅलेस्टिनी इस्लामिक दहशतवादांविरोधात (Palestinian Movement Islamic Jihad) इस्त्राइलने गाझावर एअरस्ट्राईक केला आहे. इस्त्राइलच्या हवाई हल्ल्यात लहान मुलं आणि महिलांसह 24 जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात  203 जण जखमी झाले आहेत. 


शुक्रवारीही केला होता हवाई हल्ला


इस्त्राइलने इस्लामिक जिहादी संघटनांविरोधात 'ब्रेकिंग डॉन ऑपरेशन' सुरु केलं आहे. इस्त्राइलने याधी शुक्रवारीही गाझावर एअरस्ट्राईक केला होता. या हवाई हल्ल्यात हमास कमांडरसह 10 जणांचा मृत्यू झाला होता. याशिवाय 50 जण जखमीही झाले होते. पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली होती. 


पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेनं दिली धमकी


पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास आणि इस्त्राइल यांच्यात संघर्ष सुरु आहे. इस्त्राइलकडून गाझावर दुसरा क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला आहे. याआधीच्या हल्ल्यात हमासचा एक कमांडरही ठार झाला आहे. यानंतर आता पॅलेस्टिनी इस्लामिक जिहादी संघटनेचा म्होरक्या जियाद नखालाह यांनी इस्त्राइलला हवाई हल्ला करण्याची धमकी दिली आहे.


हमास कमांडरसह 10 जणांचा मृत्यू


इस्रायलने गाझावर शुक्रवारीही एअरस्ट्राईक केला. या हल्ल्यात हमास अतिरेकी संघटनेच्या (Hamas) कमांडर सह 10 जणांचा मृत्यू झाला आहे. इस्त्राइलने शुक्रवारी गाझावर अनेक हवाई हल्ले केले. यामध्ये हमासच्या कमांडरसह सुमारे 10 जण जखमी झाले आहेत. पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला पॅलेस्टिनी बंडखोऱ्यांच्या अटकेनंतर तणावपूर्ण वातावरण पाहायल मिळालं. त्यानंतर शुक्रवारी इस्त्राइलने गाझा पट्टीवर अनेक एअरस्ट्राईक केले.


मागील 15 वर्षांपासून संघर्ष


पॅलेस्टाईनचा दहशतवादी गट असलेला हमास (Hamas group) आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष फार जुना आहे. इस्रायल आणि हमासमध्ये गेल्या 15 वर्षांत चार युद्धे आणि अनेक किरकोळ चकमकी झाल्या आहेत. हमास आणि इस्रायल यांच्यात अलिकडच्या काळातील सर्वात भीषण लढाई मे 2021 मध्ये झाली.