Corona : 16 मार्चपासून देशात 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना कोरोना विषाणूची (Corona Vaccination) लस दिली जाणार आहे. त्यासाठी तयारी सुरू झाली आहे. चीन, सिंगापूरसारख्या देशांमध्ये संसर्गाची प्रकरणे वाढत असताना या वयातील मुलांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय केंद्राने (Central Government) घेतला आहे.


भारतात १२-१४ वर्षांच्या मुलांना जास्त धोका?
लसीकरण सुरू होण्यापूर्वी, कोविड वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष आणि लसीकरणावरील नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप (NTAGI) यांनी सांगितले की, आम्ही 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू केले आहे कारण त्यांना जास्त धोका आहे. ते म्हणाले, "चीन आणि सिंगापूरमध्ये कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत. प्रौढ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असले तरी कोणतीही हलगर्जीपणा धोकादायक ठरू शकतो. सरकारच्या निर्णयाची माहिती देताना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुथ मांडविया यांनी ट्विट केले की, "मुले सुरक्षित असतील तर देश सुरक्षित आहे! ते म्हणाले की, 12 ते 13 आणि 13 ते 14 वयोगटातील मुलांचे कोविड लसीकरण 16 मार्चपासून सुरू झाले. तसेच 60 आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाला आता बूस्टर डोस मिळू शकेल."मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, सरकारने वैज्ञानिक संस्थांशी सल्लामसलत केल्यानंतर, 16 मार्च रोजी 12 ते 13 वर्षे आणि 13 ते 14 वर्षे वयोगटातील म्हणजेच 2008, 2009 आणि 2010 मध्ये जन्मलेली मुले, त्यांच्यासाठी कोविड 19 लसीकरण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  तसेच नवीन वयोगटातील सुमारे 7.11 कोटी बालकांचे देखील लसीकरण करण्यात येणार आहे.


जगभरात येणार कोरोनाची चौथी लाट?


चीनच्या वुहान (Wuhan) शहरात 2019 मध्ये सापडलेल्या कोरोनामुळे (Corona) अवघ्या जगभरात खळबळ माजली होती, मात्र आता ओमिक्रॉन (omicron) आणि डेल्टाच्या (delta variant) मिश्रणाने उदयास आलेल्या नव्या व्हायरसमुळे पुन्हा एकदा भीती निर्माण झाली आहे. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (WHO) सांगितले की, 2021 च्या तुलनेत यावर्षी देशात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची आतापर्यंत नोंदवलेली प्रकरणे सर्वाधिक आहेत. तसेच ओमिक्रॉन आणि डेल्टाच्या मिश्रणामुळे एक नवीन व्हेरिएंट निर्माण होऊ शकतो,  जो चौथ्या लाटेसाठी जबाबदार असेल.


 


संबंधित बातम्या: