Israel-Hamas War Live Updates : इस्रायल-हमास संघर्ष सुरुच; हजारो लोकांचा बळी

Israel Palestine War : इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या 7 ऑक्टोबरला युद्धाला सुरुवात झाली असून संघर्ष कायम आहे. आतापर्यंत 3000 लोकांचा मृत्यू झाला आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 28 Oct 2023 01:13 PM
Israel Gaza Attack : हमासबाबत इस्रायलकडून मोठा खुलासा

इस्रायलने खुलासा केला की, हमासचे मुख्यालय गाझामधील सर्वात मोठ्या रुग्णालयाच्या खाली भूमिगत स्वरुपात आहे. हे युद्ध गुन्हा आहे. हमासला पॅलेस्टिनी नागरिकांच्या जीवाची पर्वा नाही, असंही इस्रायलने म्हटलं आहे. हमासला फक्त इस्रायलचा नाश करायचा आहे, असं इस्रायलने म्हटलं आहे.





इस्रायल-हमास युद्धावर प्रियांका गांधी यांची प्रतिक्रिया

यूएनमध्ये गाझामध्ये युद्धविराम लागू करण्यासाठी भारताने मतदान केलं नाही, भारतीय काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी यावर आश्चर्य व्यक्त केलं आहे. त्यांनी एक्स मीडियावर पोस्टमध्ये म्हटलं आहे की "मला धक्का बसला आहे आणि लाज वाटते की, आपल्या देशाने गाझामध्ये युद्धविरामासाठी मतदान करणे टाळले आहे. आपल्या देशाची स्थापना अहिंसा आणि सत्याच्या तत्त्वांवर झाली, ज्या तत्त्वांसाठी आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिले, ही तत्त्वे आपल्या राष्ट्राची व्याख्या करणाऱ्या संविधानाचा आधार आहेत. ते भारताच्या नैतिक धैर्याचे प्रतिनिधित्व करतात, ज्याने आंतरराष्ट्रीय समुदायाचा सदस्य म्हणून त्याच्या कृतींचे मार्गदर्शन केले आहे."





Israel-Hamas War Live Updates : इस्रायल-हमास युद्धावर भारताची स्पष्ट भूमिका

Israel-Hamas War and India Reaction : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत ‘पॅलेस्टिनी प्रश्नासह मध्य पूर्वेतील परिस्थिती’ या विषयावरील खुल्या चर्चेत संयुक्त राष्ट्रातील भारताचे उप-स्थायी प्रतिनिधी (डीपीआर) राजदूत आर. रवींद्र म्हणाले की, "इस्रायलमध्ये 7 ऑक्टोबर रोजी झालेला दहशतवादी हल्ला धक्कादायक होता आणि आम्ही त्यांचा निःसंदिग्धपणे निषेध करतो. जेव्हा इस्रायलला या दहशतवादी हल्ल्यांना सामोरे जावे लागते, तेव्हा या संकटाच्या वेळी आम्ही त्यांच्या पाठीशी एकजुटीने उभे आहोत. सध्याच्या संघर्षातील नागरिकांचा मृत्यू ही गंभीर आणि सतत चिंतेची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, विशेषतः महिला आणि मुलं, नागरिकांचे संरक्षण केले पाहिजे."

Israel-Hamas War Live Updates : इस्त्रायल-हमास युद्ध भारताच्या ड्रीम प्रोजेक्टमुळे?

Joe Biden on Hamas Israel War: इस्रायल (Israel) आणि हमास (Hamas) यांच्यातील युद्धाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी मोठा दावा केला आहे. जो बायडन (Joe Biden) म्हणाले की, नुकत्याच नवी दिल्लीत झालेल्या G-20 शिखर परिषदेदरम्यान इंडियन मिडिल ईस्ट युरोप कॉरिडॉरची घोषणा करण्यात आलेली. मला खात्री आहे की, ही घोषणाच हमासनं इस्रायलवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी कारण ठरली आहे.  

Israel-Hamas War Live Updates : इस्रायल-हमास युद्धाचा 22 वा दिवस

 Israel-Hamas War Live Updates : इस्रायल-हमास युद्धाचा आज 22 वा दिवस आहे. 7 ऑक्टोबरला सुरु झालेला हा संघर्ष काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही. 

पार्श्वभूमी

Israel Hamas Conflict : इस्रायल आणि पॅलेस्टिनी यांच्यात युद्ध सुरु आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. या संघर्षात आतापर्यंत 3000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये पॅलेस्टिनी आणि इस्रायली नागरिकांसह विदेशी नागरिकांचाही समावेश आहे. शनिवारी, 7 ऑक्टोबरला हमासने इस्रायलला लक्ष्य करत विविध शहरांवर हवाई, समुद्री आणि जमिनीवरून हल्ले करत युद्धाला सुरुवात केली. हमासने इस्रायलवर सुमारे 5000 हून अधिक रॉकेट डागले आहेत. इस्रायल लष्कराकडूनही हमासवर प्रतिहल्ले सुरु आहेत. इस्रायलकडून गाझातील हमासच्या ठिकाणांना लक्ष्य करुन त्यांचे तळ उदध्वस्त करण्यात येत आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.