Israel-Hamas War Live Updates : इस्रायल-हमास संघर्ष सुरुच; हजारो लोकांचा बळी

Israel Palestine War : इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या 7 ऑक्टोबरला युद्धाला सुरुवात झाली असून संघर्ष कायम आहे. आतापर्यंत 3000 लोकांचा मृत्यू झाला आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 24 Oct 2023 11:25 AM
Israel Hamas War : इस्रायली सैन्याने हमासचा ड्रोन हल्ला हाणून पाडला

बीबीसीच्या वृत्तानुसार, इस्रायलने हमासचे दोन ड्रोन हल्ले हाणून पाडले आहेत. हमासने इस्त्रायली लष्करी तळाला दोन ड्रोनद्वारे लक्ष्य करण्याचा दावा केला होता. आता इस्रायली लष्कराने माहिती देत सांगितलं आहे की, गाझा पट्टीतून दोन ड्रोन इस्रायलच्या हद्दीत घुसल्याचे आढळले होते, हे दोन्ही ड्रोन पाडण्याच आले आहेत.

Israel-Hamas War Live Updates : वेस्ट बँकमध्ये 96 पॅलेस्टिनी ठार

वेस्ट बँकमध्ये इस्रायली हल्ल्यांमध्ये 96 पॅलेस्टिनी ठार आणि 1,650 जखमी झाले आहेत.

Israel Gaza Attack : गाझा पट्टीत 4651 जणांचा मृत्यू

इस्रायलकडून गाझा पट्टीत हवाई हल्ले आणि बॉम्बफेक सुरुच आहे. पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, या भागात सुमारे 4651 लोक मारले गेले आणि 14,254 जखमी झाले. 

इस्रायलचा पॅलेस्टाईनवर पुन्हा हवाई हल्ला

इस्रायली सैन्याने उत्तर गाझामध्ये राहणाऱ्या लोकांना दक्षिणेकडे जाण्याचा इशारा दिला. यानुसार जे लोक गाझा सोडणार नाहीत त्यांना दहशतवाद्यांचे सहयोगी मानले जाईल.

Israel Air Strike On Palestine : पॅलेस्टिनी नागरिकांना गाझा सोडण्याचा इशारा

Israel Air Strike On Palestine : इस्रायली सैन्याने उत्तर गाझामध्ये राहणाऱ्या लोकांना गाझा सोडण्याचा इशारा देण्यात आला आहे. पॅलेस्टिनी नागरिकांना दक्षिणेकडे जाण्याचा इशारा इस्रायलने दिला आहे. जे लोक गाझा सोडणार नाहीत, त्यांना हमास दहशतवाद्यांचे साथीदार मानलं जाईल, असं इस्रायल लष्कराने म्हटलं आहे.

पार्श्वभूमी

Israel Hamas Conflict : इस्रायल आणि पॅलेस्टिनी यांच्यात युद्ध सुरु आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. या संघर्षात आतापर्यंत 3000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये पॅलेस्टिनी आणि इस्रायली नागरिकांसह विदेशी नागरिकांचाही समावेश आहे. शनिवारी, 7 ऑक्टोबरला हमासने इस्रायलला लक्ष्य करत विविध शहरांवर हवाई, समुद्री आणि जमिनीवरून हल्ले करत युद्धाला सुरुवात केली. हमासने इस्रायलवर सुमारे 5000 हून अधिक रॉकेट डागले आहेत. इस्रायल लष्कराकडूनही हमासवर प्रतिहल्ले सुरु आहेत. इस्रायलकडून गाझातील हमासच्या ठिकाणांना लक्ष्य करुन त्यांचे तळ उदध्वस्त करण्यात येत आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.