Israel-Hamas War Live Updates : इस्रायल-हमास संघर्ष सुरुच; हजारो लोकांचा बळी
Israel Palestine War : इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या 7 ऑक्टोबरला युद्धाला सुरुवात झाली असून संघर्ष कायम आहे. आतापर्यंत 3000 लोकांचा मृत्यू झाला आहे.
युद्धादरम्यान पॅलेस्टिनी नागरिकांना मूलभूत गोष्टींसाठी संघर्ष करावा लागत आहे. गाझा पट्टीपर्यंत पोहोचलेली मानवतावादी मदत पुरेशी नाही. अन्न-पाण्याअभावी पॅलेस्टिनी नागरिकांवर उपासमारीचं संकट ओढावलं आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध जसजसे अधिक तीव्र होत आहे, तसतसे इस्रायलकडे माप झुकताना दिसत आहे. याआधी इस्रायल गाझा पट्टीतील हमासच्या ठिकाणांना लक्ष्य करत होता, आता इस्रायलने वेस्ट बँकमधील हमासच्या ठिकाणांवर हल्ले वाढवले आहेत. रविवारी इस्रायली सैन्याने वेस्ट बँकमधील एका मशिदीच्या भूमिगत भागावर हवाई हल्ला केला, जिथे दहशतवादी तळ असल्याचा इस्रायली सैन्याचा आरोप आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचा आज 17 वा दिवस आहे. इस्रायल आणि पॅलेस्टिनी यांच्यातील युद्ध अधिक चिघळताना दिसत आहे.
इस्रायल हल्ला अधिक तीव्र करणार
इस्त्रायलने युद्धाच्या गाझा पट्टीमध्ये बॉम्बहल्ले वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. इस्रायली सैन्य सातत्याने हमासच्या ठिकाणांवर हल्ले करत आहेत. इस्रायली सैन्य आता जमिनीवरून हल्ला करण्याची योजना आखत आहे. पॅलेस्टिनी अतिरेकी संघटना हमासला पराभूत करण्यासाठी इस्रायलकडून मोठ्या प्रमाणावर हल्ले करण्याची योजना आखण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.
पार्श्वभूमी
Israel Hamas Conflict : इस्रायल आणि पॅलेस्टिनी यांच्यात युद्ध सुरु आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. या संघर्षात आतापर्यंत 3000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये पॅलेस्टिनी आणि इस्रायली नागरिकांसह विदेशी नागरिकांचाही समावेश आहे. शनिवारी, 7 ऑक्टोबरला हमासने इस्रायलला लक्ष्य करत विविध शहरांवर हवाई, समुद्री आणि जमिनीवरून हल्ले करत युद्धाला सुरुवात केली. हमासने इस्रायलवर सुमारे 5000 हून अधिक रॉकेट डागले आहेत. इस्रायल लष्कराकडूनही हमासवर प्रतिहल्ले सुरु आहेत. इस्रायलकडून गाझातील हमासच्या ठिकाणांना लक्ष्य करुन त्यांचे तळ उदध्वस्त करण्यात येत आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -