Israel-Hamas War Live Updates : इस्रायल-हमास संघर्ष सुरुच; हजारो लोकांचा बळी

Israel Palestine War : इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या 7 ऑक्टोबरला युद्धाला सुरुवात झाली असून संघर्ष कायम आहे. आतापर्यंत 3000 लोकांचा मृत्यू झाला आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 22 Oct 2023 02:07 PM
India Help to Palestine : भारताकडून पॅलेस्टाईनला मदत

भारताने रविवारी पॅलेस्टाईनला मदतीचा हात दिला. भारताने संघर्षात अडकलेल्या पॅलेस्टिनी नागरिकांसाठी  6.5 टन मेडिकल मदत आणि जीवनाश्यक वस्तू पाठवल्या आहेत.





Hamas-North Korea Relation : हमास आणि उत्तर कोरिया यांच्यातील संबंध

हमास आणि उत्तर कोरियाचे संबंध खूप जुने आहेत. उत्तर कोरियाचा फार पूर्वीपासूनच हमासला पाठिंबा आहे.  पॅलेस्टाईन आणि इस्रायलच्या मुद्द्यावर उत्तर कोरियाने 15 वर्षांपूर्वीही पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला होता. यावर हमासचे तत्कालीन प्रवक्ते सामी अबू झुहरी यांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनासाठी उत्तर कोरियाचे आभार मानले होते.  उत्तर कोरियाने इस्रायलविरुद्ध पॅलेस्टाईनच्या लढ्याला पाठिंबा दिला होता. त्यावेळी उत्तर कोरियाने इस्रायलच्या विरोधात म्हटलं होतं की, इस्रायल हा एकमेव अण्वस्त्रांचा अवैध मालक आहे, ज्याला अमेरिकेचा पाठिंबा आहे.

Israel-Hamas Death Toll : इस्रायल-हमास युद्धात आतापर्यंतची जीवितहानी

इस्रायल-हमास युद्धात आतापर्यंतची जीवितहानी



  • गाझा : 4469 लोक ठार, 14000 जखमी

  • इस्रायल : 1402 ठार, 5,007 जखमी

  • वेस्ट बँक : 85 ठार, 1400 जखमी

  • लेबनॉन : 27 ठार, 9 जखमी

  • एकूण : 5983 ठार, 20416 जखमी

  • बंधक /बेपत्ता : 210 ओलिस, 100 ते 200 बेपत्ता

Israel Gaza Conflict : इस्रायल आणि हमास युद्धाचा आज 16 वा दिवस

Israel Gaza Conflict : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचा आज 16 वा दिवस असून दोन्ही देशांकडून हल्ले सुरुच आहेत.

Pro Palestine Protest in London : लंडनमध्ये लाखो पॅलेस्टाईन समर्थकांचं आंदोलन

इस्रायलने गाझावर बॉम्बहल्ला थांबवावा या मागणीसाठी हजारो समर्थक पॅलेस्टिनी निदर्शकांनी शनिवारी लंडनमध्ये मोर्चा काढला. लंडनच्या हायड पार्कजवळील मार्बल आर्क येथे आंदोलक जमले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे एक लाख आंदोलकांनी या मोर्चाला हजेरी लावली होती.

Israel-Gaza Update : युद्धात दिलासा! मदत सामग्री गाझामध्ये पोहोचली

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध सुरू झाल्यानंतर 16 दिवसांनी काहीसा दिलासा मिळाल्याची बातमी आली आहे. अन्न, पाणी आणि औषधे यांसारख्या मदत सामग्रीने भरलेला ट्रक शनिवारी इजिप्तमधून रफाह क्रॉसिंगवरून गाझामध्ये दाखल झाले आहेत. 

Israel Gaxa Attack : इस्रायलकडून 20 ट्रक पॅलेस्टाईनमध्ये जाण्यास परवानगी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुमारे 20 ट्रक इजिप्तची सीमा ओलांडून गेले होते. मात्र, रफाह क्रॉसिंगवर सुमारे 170 ट्रक उभे होते आणि त्यापैकी 100 ट्रक पॅलेस्टाईनमध्ये जाणार होते, पण सध्या इस्रायलने फक्त 20 ट्रकला प्रवेश दिला.

Israel-Hamas War Live Updates : सिनेगॉगच्या अध्यक्षाची हत्या

इस्रायल-हमास युद्धादरम्यान, ज्यू लोकांचे प्रार्थनास्थळ असलेल्या सिनेगॉगच्या अध्यक्षाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.

पार्श्वभूमी

Israel Hamas Conflict : इस्रायल आणि पॅलेस्टिनी यांच्यात युद्ध सुरु आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. या संघर्षात आतापर्यंत 3000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये पॅलेस्टिनी आणि इस्रायली नागरिकांसह विदेशी नागरिकांचाही समावेश आहे. शनिवारी, 7 ऑक्टोबरला हमासने इस्रायलला लक्ष्य करत विविध शहरांवर हवाई, समुद्री आणि जमिनीवरून हल्ले करत युद्धाला सुरुवात केली. हमासने इस्रायलवर सुमारे 5000 हून अधिक रॉकेट डागले आहेत. इस्रायल लष्कराकडूनही हमासवर प्रतिहल्ले सुरु आहेत. इस्रायलकडून गाझातील हमासच्या ठिकाणांना लक्ष्य करुन त्यांचे तळ उदध्वस्त करण्यात येत आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.