Israel-Hamas War : इस्रायल आणि पॅलेस्टाईन (Israel-Palestine Escalation) यांच्यात संघर्ष अधिक भीषण झाला आहे. इस्रायलचं लष्कर आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना (Israel-Palestine Conflict) हमास (Hamas)  एकमेकांवर सातत्याने हल्ले करत आहे. मागील पाच दिवसांपासून हा संघर्ष सुरु असून थांबण्याचं नाव घेत नाही. इस्रायल लष्कराने युद्ध हमासविरोधातील कारवाई आणखी तीव्र करण्याचा गंभीर इशारा दिला आहे. इस्रायलकडून गाझा पट्टी बॉम्ब हल्ले सुरुच आहेत. तर, दुसरीकडे गाझापट्टीतूनही इस्रायलवर रॉकेट हल्ले केले जात आहेत.


इस्रायलच्या पंतप्रधानांचा मुलगा हमासविरोधात रणांगणात?


इस्रायल आणि हमास युद्धात इस्रायलचे शेकडो नागरिक आणि सैनिक मारले गेले आहेत. इस्रायली सैन्य हमासला जोरदार प्रत्युत्तर देत आहे. या युद्धात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू (Isreal PM Benjamin Netanyahu) त्यांच्या मुलालाही (Isreal PM's Son) देश रक्षणासाठी युद्धात पाठवल्याचा दावा केला जात आहे. सोशल मीडियावर अशा आशयाचे फोटो आणि ट्वीट व्हायरल होत आहेत.


बेंजामिन नेत्यानाहूंचा मुलगा सैन्यात?


व्हायरल फोटोमागचं सत्य काय?


इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध पेटल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत.  इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या हा आताचा नसून जुना असल्याचं सांगितलं जात आहे. 


न्यूजचेकरच्या रिपोर्टनुसार, हा फोटो आताचा नसून 2014 मधील असल्याचं समोर आलं आहे. जेरुसलेम पोस्टमध्ये 30 डिसेंबर 2014 रोजी प्रकाशित एका रिपोर्टनुसार, बेंजामिन नेतन्याहू यांचा मुलगा अवनर नेत्यानाहू (Avner Netanyahu) डिसेंबर 2014 मध्ये इस्रायल लष्कर (IDF-Israel Defense Forces) मध्ये भरती झाल्याचा दावा करण्यात आला. त्याआधी 1 डिसेंबर 2014 रोजी प्रकाशित झालेल्या टाइम्स ऑफ इस्रायलच्या रिपोर्टमध्येही हाच वापरण्यात आला होता. याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि त्यांची पत्नी सारा जेरुसलेमच्या अॅम्युनिशन हिल येथे त्यांचा मुलगा अवनरसोबत दिसले.).


यावरून हे सिद्ध होतं की, हा फोटो आताचा नाही तर, जुना आहे.


व्हायरल फोटो किंवा व्हिडीओंवर विश्वास ठेवू नका


दरम्यान, अनेक फोटो आणि व्हिडीओमध्ये युद्धाचं वास्तव दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. काही व्हिडीओमध्ये मृतदेहांचा खच दिसून येत आहे. काही व्हिडीओमध्ये हमासकडून मृतदेहाची विटंबना झाल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे. कोणतेही फोटो किंवा व्हिडीओ यांवर विश्वास ठेवण्याआधी नीट तपासणी करुन घ्या. योग्य माहितीची चाचपणी करा आणि त्यानंतरच व्हायरल पोस्ट विश्वास ठेवा.


इस्रायल-हमास युद्धात 3000 जणांचा मृत्यू


मंगळवारी रात्री समोर आलेल्या आकडेवारीनुसारआतापर्यंत या युद्धात 3000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पॅलेस्टिनी आणि इस्रायली नागरिक, सैनिकांचा समावेश आहे. यासोबतच काही परदेशी नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. हमास आणि इस्रायल (Israel-Hamas War) यांच्यातील संघर्षामध्ये अवघ्या पाच दिवसात 3000 हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध अधिक पेटताना दिसत आहे. शनिवारी 7 ऑक्टोबरला हमासने इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा केला. यानंतर इस्रायलनेही हमासच्या ठिकाणांना निशाणा बनवलं असून युद्ध सुरुच आहे.


महत्वाच्या इतर बातम्या :


Israel Hamas War : इस्रायल हल्ल्याचा मास्टमाईंड! एक डोळा आणि हात-पाय गमावले, प्रत्येक वेळी मृत्यूला चकवा; कोण आहे मोहम्मद दाईफ?